Headlines

Pune RTO: स्कूलबसवर कारवाईचा बडगा; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 90 टक्के वाहनांनी घेतले ‘फिटनेस’ प्रमाणपत्र – pune 90 percent of school buses and vans transporting students obtained valid fitness certificates


Pune RTO: ब्रेक, टायर, स्टीअरिंग, दिवे, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा यासह विविध सुरक्षा बाबींची तपासणी करूनच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.

pune RTO
पुणे आरटीओ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: सुरक्षित शालेय विद्यार्थी वाहतूक चालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. पुण्यातील ९० टक्के शालेय वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅन यांनी वैध ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेतले आहे; तरीही आठशे वाहनांनी अद्यापपर्यंत हे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळून आले आहे. आता आरटीओने अशा स्कूल व्हॅन व बसच्या विरोधात कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना झाला आहे. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन व बसची संख्या साडेसात हजार आहे. या सर्व वाहनांनी ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले होते. त्यासाठी विशेष मोहीम राबवत सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी देखील काम सुरू ठेवण्यात आले होते. त्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आतापर्यंत ७,३३९ बसपैकी ६,५४६ स्कूल बसचालकांनी वैध फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे.

Maharashtra TimesMaharashtra Politics : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा
मात्र, अद्यापही ७९३ स्कूल बसकडे हे प्रमाणपत्र नसल्याचे दिसून आले आहे. तर ११३ शालेय व्हॅनपैकी ९४ व्हॅनकडे वैध ‘फिटनेस’ असून १९ व्हॅन ‘फिटनेस’ विना असल्याची नोंद आहे. स्कूलबस नियमावलीनुसार व्यावसायिक स्वरूपात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी दर वर्षी ‘फिटनेस’ तपासणी आवश्यक असते.

आता होणार कारवाई…
पुणे आरटीओकडून शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वैध ‘फिटनेस नसलेल्या वाहनांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. पालकांनीही मुलांची वाहतूक करणाऱ्या बस किंवा व्हॅनचे प्रमाणपत्र, परवाना, सुरक्षा नियमांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; तसेच, खासगी वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Maharashtra TimesSuccess Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, बारामतीच्या लेकीची देशात झेप; मुलींमध्ये ऑल इंडिया रँक-1
७३३९ —एकूण स्कूलबसची संख्या
७४५२ —पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणारी एकूण वाहने
६५४६ —‘फिटनेस’ घेतलेल्या वाहनांची संख्या

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बस आणि व्हॅन यांनी ‘फिटनेस’ची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी शनिवार व रविवारी देखील कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. वैध प्रमाणपत्र न घेतलेल्या वाहनांना आता कारवाई केली जाणार आहे. –स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा