Headlines

Jayant Patil Denies NCP Merger & NDA Alliance Rumors


राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत

.

‘एनडीएकडून निमंत्रणच नाही, मग प्रश्नच कुठे?’

एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “एनडीएने आम्हाला काय निमंत्रण दिलंय? तिथे जाण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाही. आम्ही कुठलेही खाते मागितलेले नाही किंवा कोणतीही मागणी केलेली नाही.” अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर मिश्कील भाष्य करत ते म्हणाले, “गेल्या दोन-तीन दिवसांत तुम्ही माध्यमांनी मला दोन-तीन वेळा अर्थमंत्रिपदाची शपथच दिली आहे.”

विलीनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबतही जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमची कोणाशीही विलीनीकरणाची चर्चा सुरू नाही. या क्षणापर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहून आमचीच करमणूक होते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही आजही सरकारच्या विरोधातच काम करत आहोत. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्यामुळे सत्तेत जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.”

‘सर्व आमदार-खासदार शरद पवारांसोबतच’

पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, असे आवाहन करत जयंत पाटील म्हणाले की, “सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही.”

सोनम वांगचुक प्रकरणावर केंद्र सरकारवर टीका

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना हटवून रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवरही जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “वीस दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे समजू शकते. मात्र, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना हटवण्याचे कारण समजत नाही.”

‘पत्नीला सोबत राहण्याची परवानगी द्यावी’

जयंत पाटील यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्यांनी यापूर्वीच्या घटनेचाही उल्लेख करत म्हटले की, “याआधी वांगचुक यांना राजस्थानमध्ये नेले होते, तेव्हाही त्यांच्या पत्नीला भेटू दिले नव्हते. त्यांना ताब्यात का घेतले आणि नंतर का सोडले, हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही.”

नेमकं प्रकरण काय?

गेल्या 28 जूनपासून सोनम वांगचुक हे ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. त्यांची प्रकृती खालावल्याने आणि डॉक्टरांनी आरोग्याबाबत गंभीर इशारा दिल्यानंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला असून, 20 जुलै रोजी प्रस्तावित ‘संसद मार्च’च्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या वाचा…

आमचा पक्ष एकसंध, सर्व नाराजी दूर होतील!:हसन मुश्रीफांचा दावा; अर्थखाते, दादा भुसेंवरील आरोप आणि अलमट्टी धरणावरही स्पष्टोक्ती

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, महायुतीमधील अर्थखात्याचा तिढा आणि मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध असून सर्व नेत्यांची नाराजी लवकरच दूर होईल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. येथे वाचा संपूर्ण बातमी

भाजपचे मूळ कार्यकर्ते आजही सतरंज्याच उचलताहेत:सतेज पाटलांचा भाजपवर घणाघात, जयंत पाटलांच्या प्रवेशाबाबतही केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. ‘जयंत पाटील कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत,’ असा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच, सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या अंतर्गत अवस्थेवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा

सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत