Headlines

Pune Rain: खडकवासला धरणातून विसर्ग; धरण 100 टक्के भरले, मुठेला पूर आल्याने भिडे पूल पाण्याखाली


Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे मुठा नदीला पूर येऊन बुधवारी भिडे पूल पाण्याखाली गेला.

खडकवासला
खडकवासला धरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण बुधवारी शंभर टक्के भरले.धरण साखळी प्रकल्पातील जोरदार पावसामुळे जलसंपदा विभागाकडून खडकवासला धरणातून मंगळवारी मध्यरात्रीपासून विसर्ग सुरू करण्यात आला.

बुधवारी पहाटे विसर्ग २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला. त्यामुळे नदीकाठलगतच्या रहिवासी भागात पाणी शिरले. पुरामुळे भिडे पूलही पाण्याखाली गेला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती.
Maharashtra TimesPune Rain Updates: पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांसह प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; कधीपर्यंत राहणार निर्बंध?
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळी प्रकल्पात एक जुलै महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून १४.९५ अब्ज घनफूट (टीएमसी) अर्थात ५१.३० टक्के पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीला तोंड देणाऱ्या शहराला दिलासा मिळाला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे जून महिना कोरडा गेल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरतील का, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांतील दमदार पावसामुळे पुणेकरांची किमान आठ महिन्यांची चिंता मिटली आहे.

धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून मुठा नदीपात्रात मंगळवारी ८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. मंगळवारी रात्री बारा वाजता ८४२, एक वाजता एक हजार ६८४, दीड वाजता तीन हजार ४२४, अडीच वाजता सहा हजार ६३४ क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. सव्वा तीन वाजता सुरू असलेला १४ हजार ३९३ क्युसेकचा विसर्ग पहाटे साडेपाच वाजता २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता १८ हजार २७१ क्युसेक, तर रात्री आठ वाजता विसर्ग १५ हजार १५७ क्युसेक करण्यात आला. हा विसर्ग रात्री १०.३० वाजता पूर्ण बंद करण्यात आला.

Maharashtra TimesPune News : ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले
पाणीसाठा १४.९५ वर
धरणसाखळीतील पाणीसाठ्यात २४ तासांत २.७४ टीएमसीने वाढ झाल्याने पाणीसाठा १४.९५ टीएमसीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा १९.५५ टीएमसी होता. आत्तापर्यंत खडकवासल्यात ४१७, पानशेत येथे ९७२, वरसगाव येथे ९४७ तर, टेमघर येथे १ हजार १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Maharashtra TimesMoshi Building Collapse: मोशीत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; 7 जणांची सुटका, 11 कामगार अजूनही ढिगाऱ्याखालीच
चार धरणे काठोकाठ
भीमा खोऱ्याअंतर्गत जिल्ह्यातील २७ धरणांपैकी खडकवासल्यासह वडज, कळमोडी आणि कासारसाई ही धरणे शंभर टक्के भरल्याने विसर्ग सुरू करून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येत आहे. येडगाव, चिल्हेवाडी, चासकमान, भामा-आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, मुळशी, गुंजवणी, नीरा-देवघर, वीर ही धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. वडज धरणातून १४ हजार, चिल्हेवाडी धरणातून तीन हजार १३, कळमोडीतून पाच हजार ४५९, वडिवळे धरणातून एक हजार १२३, कासारसाई धरणातून तीन हजार २७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा