Pune Police Raid The Houzz Commune Pub Near Airport Files Case Against Owner and Manager; पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा
Pune Police Raid The Houzz Commune Pub Near Airport Files Case Against Owner and Manager; पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा
Pune Police Raid on The Houzz Commune Pub : पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीय. अशातच पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विमानतळजवळील नामांकित पबवर छापा मारला आहे.
पुणे द हौज कम्युन पब पोलीस छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या सुप्रसिद्ध पबवर रविवारी पहाटे तीन वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अचानक मोठी कारवाई केली आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने पब, बार आणि क्लब सुरू ठेवण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंतची अंतिम वेळ निश्चित केली आहे. मात्र, या कडक नियमांची उघडपणे पायमल्ली करत या पबमध्ये पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने रंगारंग पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या या छाप्यात उघडकीस आले.
आतले दृश्य अत्यंत धक्कादायक
गुन्हे शाखेच्या पथकाला विमाननगर भागातील या पबमध्ये प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. याच माहितीची शहानिशा करण्यासाठी रविवारी भल्या पहाटे पोलिसांनी या पबवर धडक मारली. पोलीस जेव्हा पबच्या आत शिरले, तेव्हा आतले दृश्य अत्यंत धक्कादायक होते. डीजेच्या दणदणाटावर आणि कर्णकर्कश संगीताच्या तालावर डान्स फ्लोअरवर तब्बल 60 ते 70 तरुण-तरुणी बेभान होऊन नाचत होते. वेळेचे कसलेही भान न ठेवता सुरू असलेल्या या पार्टीतील संगीताचा आवाज पोलिसांनी तातडीने बंद पाडला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण-तरुणींना प्राथमिक चौकशीसाठी लागलीच ताब्यात घेतले.
या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, वेळेच्या मर्यादेचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणीपबचालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील नाईट लाईफ आणि पब संस्कृतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री दीड वाजेची स्पष्ट मुदत प्रशासनाने आखून दिलेली असतानाही, तब्बल दीड तास उलटून गेल्यानंतरही हा पब एवढ्या निर्धास्तपणे कसा आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.
केवळ वेळेचे उल्लंघनच नाही, तर या पबमध्ये मद्यपान करण्यासाठी आणि दारूविक्री करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून अधिकृत परवाना घेण्यात आला होता की नाही, याचीही पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. तसेच, पबमध्ये अग्निशमन दलाचे आणि इतर आवश्यक परवाने होते का, हे देखील तपासले जात आहे. नियम मोडून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अशा पब आणि हॉटेल्सवर यापुढील काळातही पोलिसांची करडी नजर राहणार असून, अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त अधिक तीव्र केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा