Headlines

Pune News: आईचा अचानक मृत्यू, धक्का सहन न झाल्याने तरण्याबांड लेकानेही जीवन संपवलं; मायलेकरावर एकाच वेळी अंत्यसंस्कार


Pune News: आईचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेनं परिसरात हळहळ.

pune news
आई मुलाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय मुलाने शनिवारी सकाळी घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत या मायलेकांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदा दोडके (वय ५०) आणि साहिल गणेश दोडके (वय २५, दोघे रा. पर्वती दर्शन) अशी या मायलेकाची नावे आहेत.

दोडके कुटुंब मूळचे दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहेत. तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ते काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याने राहायला आले होते. मंदा दोडके या वृद्ध रुग्णांच्या सेवाशुश्रृषेचे काम करायच्या. चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल एकुलता एक मुलगा होता. पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकणे आणि लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे असा त्याचा दिनक्रम होता.

Maharashtra TimesPune Accident: राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. साहिलने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत होती. घटनेच्या दिवशी साहिल आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला. मात्र, त्याच्या आईचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईला वाचवू न शकल्याच्या दुःखातून त्याने तातडीने घर गाठले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी दहाच्या सुमारास नातेवाइकांनी त्याचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या भाच्याने दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता, साहिलने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune Crime : लोहगडावरुन ढकल्याचा सराव केला, पोलिसांपासून बचावाची योजना आखली, आईला पहिला फोन; चौकशीत सिया-चेतन फाडफाड बोलले
उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू
साहिलने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला ससूनमध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ससूनमध्येच उपचार घेणाऱ्या त्याच्या आईचाही मृत्यू झाल्याची माहिती पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा