Headlines

Pune Mulshi Siya Dupes Mulshi Police Patil of 56 Lakh in Fake Share Trading Scam through Social Media Investment Trap; आणखी एक सिया अन् नवा स्कॅम, पुण्याच्या मुळशीतील पोलीस पाटलांची फसवणूक; 10 कोटींचं आमिष देऊन…


Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘सिया’ नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांना गंडवले आहे.

Mulshi Police Patil Stock Market Fraud
मुळशी पोलीस पाटील शेअर बाजार फसवणूक(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या नावावरून अजूनही उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता ‘सिया’ नावाच्याच एका अज्ञात महिलेनं सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून तब्बल 56 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाईन शेअर बाजारात मोठा परतावा देण्याचं गाजर दाखवून सायबर चोरट्यांनी ही मोठी रक्कम लाटली आहे.

पोलीस पाटलांची फसवणूक

मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाने याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात पोलीस पाटलाने टप्प्याटप्प्याने 56 लाख 25 हजार रुपयांची शेअर बाजारात गुंतवणूक केली. मात्र, एकाही रुपयाचा परतावा न मिळाल्यानं आणि मूळ रक्कमही अडकल्यानं आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या तक्रारीवरून पौड पोलिसांनी ‘सिया’ नामक महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारदारानं सोशल मीडियावर एका नामांकित ब्रोकरेज कंपनीची भासणारी जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवर क्लिक करताच त्यांना गुंतवणुकीसंदर्भातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. ग्रुपमध्ये जोडल्यानंतर ‘सिया’ नावाच्या महिलेने तक्रारदाराशी वैयक्तिक संवाद साधला. तिने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोबाईलमध्ये एक अनधिकृत ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करायला लावले.

पोर्टफोलिओ थेट 10 कोटींवर

सुरुवातीला या बनावट ॲपमध्ये तक्रारदाराला मोठा नफा होत असल्याचं आभासी चित्र दाखवण्यात आलं. अगदी सवलतीच्या दरात आयपीओ देण्याचं आमिषही दाखवलं गेलं. तक्रारदारानं जसजशी रक्कम वाढवली, तसतसा डॅशबोर्डवरील त्यांचा पोर्टफोलिओ थेट 10 कोटी रुपयांवर पोहोचलेला दिसला. डॅशबोर्डवर दिसणारी 10 कोटींची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी जेव्हा तक्रारदारानं प्रयत्न केला, तेव्हा त्यांना खरी परिस्थिती समजली. या भामट्यांनी ही रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त 30 लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून भरण्याची मागणी केली.

संशय आल्यानं तक्रारदारानं आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे मिळणार नाहीत हे लक्षात येताच आरोपींनी सर्व संपर्क तोडून टाकले आणि व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचं उघड होताच तक्रारदारानं पौड पोलीस ठाणे गाठलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे पुण्यात दुसऱ्या सियाच्या भामटेगिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा