Headlines

Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर


मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले आणि आंदोलकांना ‘घाण’ तसेच ‘गटार जनरेशन’ असं संबोधलं. या वक्तव्यावरून कंगना रणौत ही वादात सापडली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी तिला श्वानाची उपमा देत जहरी टीका केली आहे. “कंगना खासदार आहे, पण ती एक घाणेरडी नटी आहे. तिच्यावर थुंकायला पाहिजे, इतकी ती नालायक बाई आहे,” असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला आहे.

कंगना रणौत हिच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा कंगनाचे जे कोणी नेते आहेत त्यांनी तिला कंट्रोल केलं पाहिजे. तरुण आणि आपले जेन झी यांना तुम्ही पुन्हा आव्हान देत आहात. तरुणांनी तुम्हाला दाखवून दिलं आहे आणि यापुढेही दाखवून देतील. अशी घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं आणि हिंदुस्तानातील तरुण मुलं व त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करायचा अधिकार भाजपच्या या खासदार बाईला दिला कोणी?” असा खरमरीत सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, किशोरी पेडणकरे यांच्या या आक्रमक टीकेला भाजपच्या गोटातून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कंगनाने तरुणांबद्दल नेमकं काय म्हटलंय?

कंगना रणौत हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आंदोलक विद्यार्थ्यांवर टीका केली. ‘माझ्या आयुष्यात एका ठिकाणी इतकी विद्रूपता कधीच पाहिली नाही. जेन झी आंदोलनांचे हे रील्स उलटी आणणारे आहेत. त्यांची भाषा पाहता प्रत्येक फ्रेम विसंगत, अश्लाघ्य वाटते. यांना जन्म कोण देत आहे आणि वाढवत कोण आहे?’ असं कंगनाने म्हटलं. ‘पाश्चात्य प्रभावाखालील भारतीय महिलांची नवी पिढी ‘जनरेशन गटर’ आहे. त्या ड्रग्ज, मद्यपान किंवा अनेकांशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या स्वातंत्र्याचा अभिमानाने दिखावा करतात,’ अशी टीका कंगना हिने केली आहे. याबाबतची तिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी आणि खासदार इमरान प्रतापगढी यांनी कंगनाच्या विधानावर आक्षेप घेतला.

तरुणांबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

‘माझ्याकडे अधिकार असता, तर जंतरमंतर परिसरात संचारबंदी लावून पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले असते,’ असे वक्तव्य उजव्या विचारसरणीचे राजकीय विश्लेषक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असलेल्या भारतीय विचार केंद्रमचे माजी पदाधिकारी टी. जी. मोहनदास यांनी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मोहनदास यांच्या वक्तव्याविरोधात केरळमध्ये तसेच समाजमाध्यमांवर संताप व्यक्त झाला. भाकपशी संलग्न ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने राज्य पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल करून मोहनदास यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. दरम्यान ‘मोहनदास यांची भूमिका वैयक्तिक असून ते संघाचे कोणत्याही पातळीवरील पदाधिकारी नाहीत,’ असे निवेदनाद्वारे स्पष्ट करत, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. बी. श्रीकुमार यांनी मोहनदास यांच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत