Headlines

Pune Metro News: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार ; विस्ताराचा ‘डीपीआर’ सादर, पिंपरी


Pune Metro News: पुण्यामध्ये पिंपरी – चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.विस्ताराचा डीपीआर देखील सादर करण्यात आला.

_ पुणे मेट्रो
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,पिंपरी: स्मार्ट सिटी’पासून ‘स्मार्ट मोबिलिटी’कडे वाटचाल करताना, पिंपरी-चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) सोमवारी (२७ जुलै) सादरीकरण करण्यात आले. हा आराखडा मान्यतेसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

प्रकल्प आराखडा सादर

शहराच्या विकासाचा वेग लक्षात घेऊन मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे; तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या ‘डीपीआर’मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, या अनुषंगाने ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्प आराखडा सादर केला.

उपस्थिती

महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, रिपब्लिकन पक्षाचे कुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठिया या वेळी उपस्थित होते.

सुसंगत नियोजनाची सविस्तर माहिती

बैठकीत हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केले. प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय; तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Maharashtra TimesMira Road Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, शाळेसमोरच संतापजनक कृत्य; पोलिसांकडून मोठ्या घटनेचा पर्दाफाश

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’

मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बससेवा, पार्किंग, मल्टि-मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ यांचा प्रभावी समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या सुविधांमुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे.

‘रिंग मेट्रो’चेही स्वप्न !

सुमारे १२ हजार ९३७ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती – वाकड – नाशिक फाटा – चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करताना या शहरासाठी ‘रिंग मेट्रो’चे स्वप्नही साकार होणार असल्याचा दावा करण्यात आला.

Maharashtra TimesYugendra Pawar: दादांच्या अपघाताचा रिपोर्ट नाही, मालकावर कारवाई नाही, आमचा संयम संपतोय; युगेंद्र पवार संतापले!

प्रस्तावित ३४ मेट्रो स्थानके

भक्ती- शक्ती चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर ,आदर्शनगर , मुकाई चौक, रावेत,पुनावळे गाव, पुनावळे , ताथवडे गाव, ताथवडे ,भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागार, पिंपळे गुरव,नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर,गवळी माथा चौक, सेंच्युरी,एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१ ,गोडाउन चौक, पीआयईसीसी,भारतमाता मोशी, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा