Mule Account Fraud: कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) असे आळंदी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस ठाण्याच्या ‘सायबर सेल’ने ही कारवाई केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी येथील गोडाउन चौकाजवळून सचिन काळे याला ताब्यात घेण्यात आले.
Amruta Fadnavis : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
आरोपीने स्वतःच्या नावे वेगवेगळ्या नऊ बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांचा ताबा सायबर गुन्हेगारांना देऊन त्या बदल्यात मोठे कमिशन तो मिळवत होता. या खात्यांवर आलेली रक्कम तो एटीएम आणि चेकद्वारे काढून थेट टोळीला पुरवत असे. नॅशनल ‘सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल’वरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातच सायबर फसवणुकीच्या प्रकारांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एखादा मोठा आरोपी सापडणे याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
म्युल अकाउंट म्हणजे काय ?
सायबर भामटे फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता भुलथापा देऊन किंवा कमिशन देऊन इतर व्यक्तींची खाती वापरतात. अशा खात्यांना म्युल अकाउंट म्हणतात.
Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलिस वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढणार; आरोपींच्या कामाचे ऑडिट सुरु, 2 अधिकारी निलंबित
आकडेवारी एका नजरेत
१५० कोटी रुपये —एकूण फसवणूक
६५ जण —(देशभरात) बाधित नागरिक
सचिन काळे (वय २५ वर्षे) —आळंदी पोलिसांनी पकडलेला आरोपी
९ —बँकांमध्ये आरोपीने उघडलेली बँक खाती
१ कोटी १५ लाख —स्वीकारलेली रक्कम
२ —दाखल गुन्हे

