Headlines

Pune Industry Grievance Redressal Cell Set up in District Collector Office for Complaints; उद्योगांच्या तक्रारींसाठी निवारण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात करता येणार तक्रार; तक्रार कोठे करणार?


Pune News : पुण्यातील वाढत्या उद्योगांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगांच्या तक्रारीसाठी निवारण कक्ष उभारण्यात आला आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या मेलवर तक्रार करायची आहे.

Pune News
पुणे उद्योग निवारण कक्ष(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चाकणसह पुणे जिल्ह्यात नवीन उद्योग; तसेच जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलीटी सेंटर्स- जीसीसी) मोठ्या प्रमाणावर येत असून, सध्याच्या उद्योगांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी विभागांकडून आवश्यक मान्यता, परवानग्या आणि सेवा मिळविताना उद्योगांची दमछाक होत आहे. त्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत असल्याने त्या समस्या, तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

‘इंडस्ट्रिअल टाउनशिप’ उभारण्याचे आश्वासन

गेल्या काही दिवसांपूर्वी चाकण परिसरातील अनेक उद्योगांच्या अडीअडचणीचा समस्यांची कोंडीला वाचा फुटली आणि त्यातून राज्य सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडस्ट्रिअल टाउनशिप’ उभारण्याचे आश्वासन दिले; तर चाकण शहराचा आराखडा तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याबरोबर चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार, उद्योगांच्या समस्यांबाबत आढावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात रक्षकच बनला भक्षक! मुलगा होत नाही म्हणून पुण्यात PSI पतीची पत्नीला मारहाण, शेतात नेऊन जबरदस्ती गर्भपात

कार्यवाही करणे शक्य

तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, संबंधित उद्योगाचे नाव, संपर्क क्रमांक; तसेच आवश्यक कागदपत्रे किंवा उपलब्ध माहिती सोबत सादर करावी. यामुळे प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधत कार्यवाही करणे शक्य होणार आहे. चाकण परिसरासह पुणे जिल्ह्यातील उद्योगांना सरकारी सेवा आणि परवानग्या मिळविताना येणाऱ्या अडचणींचे प्रभावी आणि वेळेत निराकरण करण्यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात दोस्तीत कुस्ती! व्हॉट्सॲपवर स्टेटसमुळे डोक्यात सणक, वेताळ टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्रांनी काटा काढला; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

तक्रार कोठे करणार?

चाकणसह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या कंपन्या, उद्योगांना येणाऱ्या अडचणींबाबत तक्रार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘उद्योगांशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा समस्या असल्यास नागरिक, उद्योजकांना ०२०-२६१३००९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल; तसेच तक्रारी collector.pune@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात,’ असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा