बंडू येवले, लोणावळा: मावळातील पाटण गावात सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह मावळात हळहळ व्यक्त होत आहे. या दरडीच्या सावटाच्या भयाने सैरभैर झालेल्या गावाने गावातील आपली घरं सोडून जवळ मिळेल ठिकाणी व नातेवाईकांच्या येथे आसरा घेतला. यामुळे ओस पडलेले पाटण गाव या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात असताना गावावर मानवनिर्मित संकटाने घाला घातला आहे. दरडीच्या भीतीमुळे घरं सोडल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी पाटण गावातील सुमारे १९ घरांची घरफोडी केल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या घटनेला पोलिस प्रशासनासह इतर प्रशासनाला जबाबदार धरत तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
सोमवारी ६ जुलैच्या पहाटे मावळ तालुक्यातील मळवलीच्या जवळील पाटण गावात मोठी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला असून, दरडीमुळे परिसरातील अनेक घरांसह गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन वाहून गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, याच नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री व पहाटे गावात अक्षरशः हैदोस घालत एकाच रात्री १९ बंद घरांची कुलूप आणि कड्या तोडून संसारोपयोगी साहित्यांसह लाखो रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. अद्याप दरडीचे भयावह संकट डोळ्यासमोर व डोक्यावर असताना घरफोड्यांच्या संकटामुळे पाटण ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली असून, प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी वनराईत कुशीत मावळ तालुक्यातील मळवली जवळील पाटण वसलेले आहे. सोमवारी ६ जुलैला पहाटे डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाटण गावात दरड कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आई वडील आणि मुलगा यांचा समावेश आहे. या घटनेनंतर पाटण गावाला दरडीचा मोठा धोका निर्माण झाल्याचे वास्तव चित्र समोर आल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामस्थांना गाव खाली करण्याचे आदेश दिले.
जीवाच्या भीतीने व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी आपली घरे दारे बंद करून आप आपल्या नातेवाईकांकडे तसेच त्यांच्या इतर सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आसरा घेतला. यामुळे संपूर्ण गाव ओस पडल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. गुरुवारी मध्यरात्री व पहाटे अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी गावात प्रवेश करून एकामागून एक तब्बल १९ घरांच्या दरवाज्याच्या कड्या, कोयंडे, कुलूप व खिडक्यांच्या काचा तोडून घरात प्रवेश करत घरफोड्यांचा सपाटा लाऊन काही संसारोपयोगी साहित्यांसह घरातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून चोरटे पसार झाले आहेत.
आम्ही गाव खाली केले, मग प्रशासनाने सुरक्षा का केली नाही? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गावात धाव घेतली. आपल्या घरांची झालेली दुरवस्था आणि चोरीला गेलेला ऐवज पाहून ग्रामस्थांचा संयम सुटला. “दरडी संकटाच्या भीतीने प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून आम्ही आमची घरे दारे सोडून बाहेर गेलो. मग आमच्या मागे गावाची आणि आमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? गावात किमान दोन पोलीस कर्मचारी जरी गस्तीला ठेवले असते, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. एका बाजूला हक्काचे घर सोडून जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे साठवलेली पुंजी चोरीला गेल्याचा मानसिक धक्का, आम्ही आता जगायचे कसे?” असा प्रश्न संतप्त ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
दरडीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. दरडीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल व सैरभैर झालेल्या ग्रामस्थांना या चोऱ्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. तसेच पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना कडक शासन करावे. येथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत रिकाम्या असलेल्या पाटण गावात २४ तास पोलीस गस्त तैनात करण्यात यावा. या मागण्यासह पुनर्वसन, रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा मागण्या ग्रामस्थांनी सरकार आणि संबंधित प्रशासनाकडे केल्या आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा