Headlines

Pune court sentences the acussed from narsapur to death supriya sule makes a stern demand; नसरापूरमधील नराधमाला कोर्टाकडून मृत्युदंड; सुप्रिया सुळेंनी केली आता कठोर मागणी


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: नरसापूर येथील चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालाचे स्वागत करत कोर्ट, पोलीस आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. “हा देश संविधानाच्या चौकटीत चालतो, त्यामुळे या नराधमाला भर चौकात लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे,” अशी कठोर मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच, “या नराधमाला भर चौकात ठेचून काढलं पाहिजे,” या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी या प्रकरणात कुठलेही राजकारण झाले नसल्याचे स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, राजकारण केलं नाही’

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की या प्रकरणात राजकारण आणायचं नाही. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आम्हाला आरोपीला कठोर शिक्षा करून देण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि मी राष्ट्रवादीची आहे, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोर्टाला विनंती केली होती की, या नराधमाला भर चौकात ठेचून काढलं पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री, न्यायालय आणि पोलिसांचे मनापासून आभार मानतो.”

‘भर चौकात फाशी द्या, दया-माया चालणार नाही’

न्याय देण्याच्या प्रक्रियेतील एक मोठा टप्पा आपण पार पाडला असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या, “आता नसरापूर प्रकरणातील आरोपीने कुठलीही दया-माया करण्याची मागणी केली, तरी ती अजिबात चालणार नाही. अशा नराधमांना कोणतीही माफी नसावी.”

फास्ट ट्रॅक कोर्टामुळे न्याय लवकर मिळाला; पोलिसांचे कौतुक

“आम्ही या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती, त्यामुळेच हा निर्णय इतक्या लवकर येऊ शकला. महाराष्ट्र पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात जे कौतुकास्पद काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली, तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल आणि भविष्यात अशा भयानक घटना थांबतील,” असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत