Headlines

Pune BJP City Chief Dheeraj Ghate challenges Police to close Mumbai Dahihandi over Ganeshotsava restrictions; हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करुन दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध, भाजप शहराध्यक्षांचा पोलिसांनाच इशारा


Pune Ganeshotsava Restrictions : ‘हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करुन दाखवा, पुण्यातील गणेशोत्सवावरच अटी आणि निर्बंध का लादता?’ असा सवाल करुन भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे.

Dheeraj Ghate BJP Pune Ganeshotsav Dahihandi Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘हिंमत असेल; तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा; पुण्याच्या गणेशोत्सवावरच अटी आणि निर्बंध का?’, असा सवाल करून भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला. ‘पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाबाबत पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय अथवा निर्बंध लादल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. मंडळांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढावा,’ अशी मागणी घाटे यांनी केली.

गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक

मध्यवस्तीत काही ठिकाणी ‘डीजे’ लावण्याचा प्रयत्न झाला. त्याला पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी विरोध करून डीजे लावण्यास नकार देऊन स्पीकर्स बंद केले होते; तसेच, येत्या दहीहंडीला हीच भूमिका ठेवण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर दहीहंडी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

फडणवीस-मोहोळांशी चर्चा करणार

दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.

Maharashtra TimesNashik News : घराला कुलूप लावून डॉक्टर दाम्पत्य क्लिनिकला, परत येताच हृदयद्रावक दृश्य, सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत अंत

…तर गणपती मांडवातून बाहेरच काढणार नाही

कार्यकर्त्यांनी गणेश बीडकर आणि भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांची भेट घेतली. ‘पोलिस स्पीकर्सवर बंदी घालणार असतील; तर विसर्जनाच्या दिवशी गणपती मांडवातून बाहेर काढणार नाही,’ असा इशारा या वेळी कार्यकर्त्यांनी दिला.

‘उत्सवातून तरुणांना सकारात्मक दिशा द्या’

दरम्यान, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मराठी संस्कृती, कला, संगीत यांसह सामाजिक एकोपा आणि समाजप्रबोधनाची ही समृद्ध परंपरा आहे. या परंपरेचे जतन करताना गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीला सकारात्मक दिशा द्यावी” असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मराठी भावगीते, सुगम संगीत, भक्तिगीते, भजने, अभंग तसेच, मराठी संगीत व साहित्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन समितीने केले आहे. गणेशोत्सवातून मराठी कला, संगीत व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीला व्यसनमुक्त, जबाबदार, संवेदनशील व सक्षम समाजनिर्मितीची प्रेरणा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश द्यावा

मंडळांनी व्यसनमुक्ती व अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश द्यावा, सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करावे, मोबाइल व सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापर तसेच शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारासाठी प्रयत्न याबाबत जनजागृती करावी, असे समितीने म्हटले आहे.

Maharashtra TimesNashik Crime : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळातसेच महिला व मुलींचा सन्मान व सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन व प्लास्टिकमुक्ती, रक्तदान व अवयवदानाचे महत्त्व, वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेचे पालन, वाचनाची आवड आणि मराठी भाषा-संस्कृतीचे संवर्धन तसेच जात, धर्म व भाषेपलीकडे सामाजिक एकोपा वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.