Headlines

Pune Accident : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच करुण अंत – pune container tuck hits bike 25 yrs mother and toddler son died relative seriously injured


Pune Accident News: भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे.

pune accident
पुणे अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निघोजे येथे रविवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

कंटेनरचालक सचिन यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माधव नारायण चोपलवाड (वय ३२, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
Maharashtra TimesPune Crime : तळेगाव स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक कुकर्म, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप
दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५), देवांश चोपलवाड (वय दीड वर्ष, दोघेही रा. नांदेड) आणि हरिदास उतलवाड दुचाकीवरून जात असताना कंटेनरने धडक दिली. त्यात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास उतलवाड यांच्‍या कमरेवरून चाक गेल्‍याने ते गंभीर जखमी झाले. निघोजे परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हॉर्न वाजवल्याने मारहाण
पिंपरी : चाकण येथे स्कूटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून सोळा वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा. चाकण, मूळ रा. संगमनेर) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लक्ष्मण येरकर (वय २३, रा. नाणेकरवाडी, खेड) यांनी तक्रार दिली आहे. चाकण दक्षिण पोलिस तपास करीत आहेत.

Maharashtra TimesPune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?
सायबर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी : स्वतःचे बँक खाते आरोपी साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास भाड्याने दिले. ही घटना महाळुंगे चाकण तळेगाव रोड येथे सहा नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. अजय नेताजी सुतार (वय २५, रा. महाळुंगे गाव, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई समीर शब्बीर महात (वय २२) यांनी तक्रार दिली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा