Headlines

Property Rules: प्रॉपर्टीची डील करताना TDS भरायला विसरू नका, मालमत्ता खरेदी विक्रीवरील कर नियम बदललेत! आयकराचा नवीन नियम काय?


TDS on Property Buying: घर, फ्लॅट, प्लॉट किंवा अपार्टमेंट अशी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील मोठा आणि महत्तवाचा निर्णय मानला जातो. आजच्या काळात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता खरेदी करणे एक मोठी आर्थिक गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत, खरेदीदारांनी काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे आणि खरेदी करण्यापूर्वी विक्री करार, मालकी हक्काची पडताळणी इत्यादी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासण्याची याची खात्री करावी.

मालमत्ता खरेदीवर टीडीएसचा नवा नियम

मालमत्ता खरेदी करताना आवश्यक आणि योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यातील कायदेशीर वाद टाळता येतात. याशिवाय खरेदीदारांना मालमत्तेवरील कर नियमही माहिती असली पाहिजे. नव्या आर्थिक वर्षापासून TDS नियम लागू झाले असून कोणताही संभाव्य दंड टाळण्यासाठी आपल्या आयकर नोंदींमध्ये या व्यवहाराची नोंद केली पाहिजे.

Maharashtra TimesE20 Petrol Quality: इथेनॉल मिश्रित पेट्रोल एकदम सुरक्षित, वाहनांना धोका नाही! E20 इंधनात भेसळीच्या अफवांवर तेल कंपन्यांचे स्पष्टीकरणटीडीएस नियमांबाबत माहिती घ्या

मालमत्ता खरेदीच्या नियमांमध्ये बदल केले गेले आहेत. आताच्या नव्या नियमानुसार एखादी व्यक्ती भारतातील रहिवाशाकडून जमीन, घर किंवा इमारत यांसारखी 50 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करत असेल, तर टीडीएस आकारला जातो. खरेदीदारांनी गुंतवणुकीतील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी टीडीएसशी संबंधित कर नियम पूर्णपणे समजून घेतले पाहिजे.

टीडीएस कपात करून सरकारकडे जमा करण्याची खात्री करणेही खरेदीदाराची जबाबदारी असून 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार असल्यास आयकर कायद्याच्या कलम 194-आयए अंतर्गत 1% टीडीएस कपात करणे अनिवार्य आहे. एकूण विक्री किमतीवर, पेमेंटच्या वेळी किंवा क्रेडिटच्या वेळी, यापैकी जे आधी असेल, हा टीडीएस लागू होतो.

Maharashtra Timesभारतावर 100% टॅरिफला अमेरिकन खासदारांचाच विरोध; अमेरिकेला कसं परवडणार नाही याचं गणित मांडलंTax2Win वेबसाइटच्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन म्हणजे TAN अकाउंट नंबर आवश्यक नाही, पण खरेदीदारांना पॅन कार्डचा तपशील देणे अनिवार्य आहे. तसेच विक्रेत्याकडे पॅन नसेल, तर 1% ऐवजी 20% दराने टीडीएस कापला जाईल आणि लक्षात घ्या की टीडीएसचे कॅलक्युलेशन केवळ 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवरच नव्हे, तर संपूर्ण विक्री रकमेवर केली जाते.

Maharashtra TimesPost Office Scheme: पोस्टाच्या योजनेत एकदा 10 लाख जमा करा आणि तरुण-वयस्क सगळेच कमवू शकतात दरमहा 6000 रुपये, टेंशन फ्री जाईल रिटायर्मेंटत्याचप्रमाणे, पेमेंट हप्त्यांमध्ये केले असेल, तर प्रत्येक हप्त्याच्या पेमेंटवर किंवा क्रेडिटवर 1% टीडीएस कापला जाईल.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खरेदीदारांनी वैध TIN-NSDL पोर्टलद्वारे फॉर्म 26QB ऑनलाइन भरून सबमिट केली पाहिजे. हा नियम जमीन, निवासी घरे आणि व्यावसायिक इमारती यांसारख्या सर्व स्थावर मालमत्तांना लागू होतो, पण हा नियम शेतजमिनीला लागू होत नाही.