Headlines

Property Rights of Daughter’s Descendants; मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? मुलीचा पती, मुलं तिच्या आई-वडिलांचे वंशज होत नाहीत का? नियम वाचा


Deceased Daughter Family Property Claim: 1956 नंतर वारसा हक्काने मिळालेली कोणतीही मालमत्ता वैयक्तिक मानली जाते. मृत्युपत्राशिवाय वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यात समान वाटली जाते. त्यामुळे, मृत मुलीचा 1/3 वाटा पती आणि मुलाला मिळेल आणि वाटणीवरील दावा कायदेशीररित्या वैध राहतो. पण मृत मुलीच्या कुटुंबाला आजोबांच्या मालमत्तेत वाटा मिळतो का?

Deceased Daugher Family Claim over Grand-father's Property
मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? मुलीचा पती, मुलं तिच्या आई-वडिलांचे वंशज होत नाहीत का(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मालमत्ता किंवा संपत्तीच्या वाटणीवरून अनेकदा लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. काही लोकांना प्रश्न पडतो की नातवंडांना आजी-आजोबांच्या मालमत्तेवर कोणता हक्क असतो का? केवळ कौटुंबिक संबंधांमुळेच आपल्याला मालमत्तेवर हक्क मिळतात, असा अनेकांचा समज असतो. अशाच एका प्रकरणांपैकी म्हणजे की दिवंगत मुलीच्या पती व अपत्यांचा तिच्या आई-वडिलांच्या संपत्तीवर अधिकार.

आजी-आजोबांच्या मालमत्तेवर हक्क आहे की नाही? हे अनेक घटकांवर अवलंबून असते. सर्वप्रथम, आजी-आजोबांची मालमत्ता कोणत्या प्रकारात मोडते आणि तिचे व्यवस्थापन कोण करते, हेही समजून घेतले पाहिजे. यावरूनच नातवंडांना वाटा मिळेल की नाही हे ठरते.

Maharashtra TimesGold Silver Price Today: युद्धाच्या तणावात सराफा बाजारात उलटफेर; सोन्याच्या भावात मोठी पलटी, चांदीने फुंकला महागाईचा बिगुल

आईकडच्या आजी-आजोबांच्या संपत्तीवर नातवांचा हक्क

एका व्यक्तीच्या वडिलांना 1961 मध्ये वारसा हक्काने मालमत्ता मिळाली आणि 1977 मध्ये मृत्युपत्र न करताच निधन झाले व त्यांनी पत्नी, एक मुलगा व एक विवाहित मुलगी कायदेशीर वारस म्हणून मागे राहिले. नंतर 1999 मध्ये मुलीचे निधन झाले आणि तिच्या मागे पती व एक मुलगा राहिला. 2016 मध्ये आईने नोंदणीकृत गिफ्ट डीडद्वारे संपूर्ण मालमत्ता मुलाच्या नावावर हस्तांतरित केली तर, आता दिवंगत मुलीचा पती व मुलगा मालमत्तेच्या वाटणीची मागणी करत आहे?

अशा परिस्थतीत, प्रश्न उपस्थित होतो की मृत बहिणीच्या पती आणि मुलाचा त्या संपत्तीवर काही अधिकार असतो का? मृत मुलीचा पती आणि मुले तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा सांगू शकतात का? हा प्रश्न अनेकदा कुटुंबांमध्ये वादाचे कारण बनतो.

Maharashtra TimesPF New Rule: नोकरी बदलली तरी थेट ट्रान्सफर होईल पीएफचे पैसे; EPFO च्या नियमात झाला मोठा बदल, कोणाला मिळणार फायदा?

कायदा काय सांगतो

1956 आधी पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मानली जायची. पण हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 लागू झाल्यावर नियम बदलले. यानुसार एखाद्या व्यक्तीला 17 जून 1956 नंतर मालमत्तेचा वारसा मिळाला असेल तर ती त्याची वैयक्तिक संपत्ती मानली जाईल.

आता वरील प्रकरणात 1956 च्या कायद्यानंतर वडिलांना 1961 मध्ये मालमत्तेचा वारसा मिळालेला म्हणून ती संपत्ती त्यांची वैयक्तिक मानली जाईल. 1977 मध्ये मृत्युपत्राशिवाय मृत्यूनंतर कायदेशीर वारसांमध्ये: पत्नी, मुलगा आणि मुलगी, मालमत्ता प्रत्येकी 1/3 या प्रमाणात समान विभागली गेल्याचे मानले गेले. म्हणजे मुलीलाही 1/3 वाटा मिळाला. त्यानंतर 1999 मध्ये तिच्या मृत्यूनंतर तिचा वाटा कायदेशीर वारसांना म्हणजे पती आणि मुलाला मिळाला.

Maharashtra TimesIPO GMPs: देशातील सर्वात मोठ्या Mutual Fund कंपनीचा आयपीओ अखेर खुला झाला; 14000 रुपये गुंतवून 2548 रुपये कमावण्याची संधी!

गिफ्ट डीडच्या स्थितीत काय होतं

अशा स्थितीत, आता कायद्यानुसार आई फक्त तिचा वाटा म्हणजे 1/3 हिस्सा देऊ शकत होती आणि कायदेशीररित्या मुलाला भेट देणं वैध ठरणार नाही. त्यामुळे, मेहुणा आणि भाच्याची मालमत्तेच्या विभागणीची मागणी कायदेशीररित्या वैध आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा