Headlines

President Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेत – independence day 2026 police officers 364 and personnel have been awaiting president medal for 4 yrs


दिपेश मोरे, मुंबई : आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्यांना यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदके जाहीर होतील. इतर राज्यांच्या पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलिस दलातील अनेकांची नावे पदकविजेत्यांच्या यादीत असतील. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला जाईल. पण प्रत्यक्षात ही पदके प्रदान केली जातील का, असा प्रश्न राज्यातील शेकडो पोलिसांना पडला आहे. कारण, जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांचे मागील चार वर्षांपासून वितरणच करण्यात आलेले नाही. ही पदके जाहीर झालेले काही पोलिस निवृत्त झाले आहेत, तर अनेक जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनआणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात. शौर्य पदके, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक सेवा अशा श्रेणींमध्ये त्यांना गौरवले जाते. पदक जाहीर झाल्यानंतर साधारणतः वर्षभरात राज्यपालांच्या हस्ते पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते.

Maharashtra TimesGhatkopar Landslide : वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंतपदक लावण्याचा मानसन्मान वेगळाच असतो’, अशी प्रतिक्रिया हे पोलिस व्यक्त करीत आहेत. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात. शौर्य पदके, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक सेवा अशा श्रेणींमध्ये त्यांना गौरवले जाते. पदक जाहीर झाल्यानंतर साधारणतः वर्षभरात राज्यपालांच्या हस्ते पोलिसांना त्यांचे नाव कोरलेली पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते. राजभवनात होणारा हा दिमाखदार सोहळा पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील अनमोल क्षणांपैकी एक मानला जातो. राज्यातील ३६४ पोलिस आणि त्यांचे कुटुंबीय मागील चार वर्षांपासून या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट २०२३पासून जानेवारी २०२६पर्यंत जाहीर झालेल्या पदकांचे अद्याप वितरणच झाले नाही.

‘पदके कधी मिळणार हे माहीत नाही. विलंब का होत आहे, याची कारणे कोण देत नाही. यावर्षी तरी राजभवनात कार्यक्रम होईल आणि पदक मिळेल, असे वाटत असतानाच निवृत्ती आली. माझ्याप्रमाणे अनेकजण वाट पाहून निवृत्त झाले. सेवेत असतानाच हे पदक वर्दीवर लागले असते तर छाती अभिमानाने फुलली अस्ती’, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

पदकावर नाव कोरायला विलंब लागतो, करोनामुळे वेळापत्रक कोलमडले, राज्यपालांकडून वेळ मिळत नाही, अशी वेगवेगळी कारणे ऐकायला मिळत असल्याचे एका हेड कॉन्स्टेबलने सांगितले. तर, ‘जवळचे अनेकजण कुतूहलापोटी राष्ट्रपती पदक दाखवायला सांगतात, पण ते अजून मिळाले नाही सांगताना आम्हालाच ओशाळल्यासारखे होते. कायदा-सुव्यस्था असो वा अन्य काही घटना, प्रत्येकवेळी पोलिसच पुढे असतात. अशावेळी हा विलंब म्हणजे आमची अवहेलना आणि राष्ट्रपतींचा अपमान आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया एका पोलिसाने दिली.

Maharashtra TimesVile Parle Fire : मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंतपदकविजेत्या दोन पोलिसांचा मृत्यू
पदकविजेत्या ३६४ पोलिसांपैकी दोघांचे निधन झाल्याचे सांगण्यात येते. जानेवारी २०२५मध्ये जाहीर झालेल्या नावांमध्ये यापैकी एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश होता.

पदके जाहीर झालेले पोलिस अधिकारी व अंमलदार
ऑगस्ट २०२३ : ७६
जानेवारी २०२४ : ६२
ऑगस्ट २०२४ : ५९
जानेवारी २०२५ : ४३
ऑगस्ट २०२५ : ४९
जानेवारी २०२६ : ७५

पदनिहाय तपशील
वर्ष –शौर्य –उल्लेखनीय –गुणवत्तापूर्वक

ऑगस्ट २३— ३३ —०३ —४०
जानेवारी २४— १८ —०४ —४०
ऑगस्ट २४— १७ —०३ —३९
जानेवारी २५— ०० —०४ —३९
ऑगस्ट २५— ०७ —०३ —३९
जानेवारी २६— ३१ —०४ —४०



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत