Prashant Damle On Gen Z : प्रशांत दामले यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जेन झींबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रशांत दामले हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून ते सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आपलं मत व्यक्त करतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जेन झींबद्दल भाष्य केलं आहे.
जेन झींबद्दल प्रशांत दामले यांचं वक्तव्य
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांना जेन झींचं आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर प्रशांत दामले म्हणाले की, ‘हा योगायोग आहे. मी आवाहन केलं आणि त्याने राजीनामा दिला असं काही होत नाही. असं होऊही नये. तरुणांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांची इच्छा वेगळी असते. ते ऐकून घेणं फार महत्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याला योग्य वेळी उत्तर देणं महत्वाचं आहे. त्यांना हल्ली सगळं झटपट पाहिजे. मी तुला सांगितलंय आणि तू परत दोन दिवसांनी फोन करून सांगशील तर त्यांना चालत नाही ते. तिथल्या तिथे त्यांना उत्तर पाहिजे असतात कारण ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्यांच्याकडे तशी साधनं आहेत.’
Star Pravah Serial : दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्याला स्टार प्रवाहच्या मालिकेची भुरळ; मराठी शिकण्यासाठी दररोज बघतो मालिका ‘काहीवेळा अर्धवट माहितीवर सुद्धा त्यांची गाडी ते ढकलतात. मला असं वाटतं की, ५० पैकी ४० लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलतात. १० जण काम करणारे असतात किंवा अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. मला असं वाटतं की, १० जण कोण आहेत हे ओळखायला पाहिजे. म्हणजे, फक्त सरकारच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये जे अभ्यास करून बोलतात ते खरे असतात. त्यामुळे त्यांची मतं काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यावर लगेच लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आताच्या मुलांना खूप जास्त स्वातंत्र्य आहे. इतकं पण नको. स्वातंत्र्य नको, असं म्हणायच्या आधी मी त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे तर मी म्हणू शकतो त्यांना स्वातंत्र्य नको. त्यांनी एखादं काऊंटर केलं तर त्याच्यावर मला काऊंटर करता आलं पाहिजे.’
‘५० पैकी १० मुलं अतिशय हुशार आहे आणि ४० मुलांचा अर्धवट अभ्यास आहे. त्या अर्धवट अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल मी बोलतोय. ही जी अर्धवट अभ्यास करतात ना, समजा NEET चा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहित नसेल तर NEET च्या घोषणा देऊन काय उपयोग काय? ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टींसाठी मी इथे आलेलो आहे, ती गोष्ट तुम्हाला करायची असेल, तर त्या गोष्टीची तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. मी ४४ वर्ष इथे काम करतोय. इथे काय काय अडथळे येऊ शकतात हे मला माहिती आहे. १९८३ ते २००८ मी फक्त कलाकार होतो. या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो. अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं मला वाटतं.’ असं प्रशांत दामले यांनी शेवटी सांगितलं. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा