Headlines

Prajakta Mali : ‘मी अधिकृतपणे क्रूरतामुक्त झालेय’, वाढदिवशी प्राजक्ता माळीचा महत्वाचा निर्णय, पोस्ट करत दिली माहिती


Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीनं वाढदिवशी महत्वाचा निर्णय घेतला असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे.

Prajakta Mali Post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनेत्रीनं सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतलं. तसेच अभिनेत्रीनं वाढदिवसानिमित्त आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल प्राजक्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट

प्राजक्ता माळीनं पुण्यातील सारसबागेतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं असून दर्शन घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं की, ‘आज सकाळी सिद्धिविनायक आणि आई तळजाई माता यांचं दर्शन घेतलं आणि या क्षणापासून मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या मर्जीनं नाही, तर सक्तीनं.’

Maharashtra TimesDada Kondke : प्रकृती अचानक खालावली, ॲम्ब्युलन्स मिळेना, गाडीनं बॉडी घरी आणली; दादा कोंडकेंच्या निधनाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग
‘माझं शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारत नाहीये, त्यामुळे मला सतत खोकला येत होता. त्यामुळे यापुढे मी कॉफी आणि चहा घेणार नाही, आश्चर्य वाटून घेऊ नका. माझं शरीर सर्व ‘तामसिक’ गोष्टी नाकारत आहे. फक्त काही खोटं बोलणाऱ्या आणि फसवणाऱ्या लोकांना वगळता, मी अधिकृतपणे आतापासून क्रूरतामुक्त झाले आहे.’ असं प्राजक्तनं शेवटी म्हटलं आहे. प्राजक्ता माळीच्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं असून तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

व्हिगन म्हणजे काय?

व्हिगन जीवनशैलीत कोणत्याही प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जात नाही. दुध, दही, पनीर असे पदार्थ, त्याचसोबतच चामडे, लोकर यांसारख्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर व्हिगन लोक करत नाहीत. बॉलिवूडमधील रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, आमिर खान, अनुष्का शर्मा हे कलाकार व्हिगन झाले आहेत.

Maharashtra TimesSimple Kapadia : ‘राजेश खन्ना यांनी मला कचऱ्यासारखी वागणूक दिली’, सुपरस्टारचं मेहुणीसोबत वाईट वर्तन; अभिनेत्रीनं सांगितलेलं काय घडलेलं?
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेत्रीला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्राजक्तानं ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, चिकी चिकी बुबुम बूम’, ‘रानबाजार’ यांसारख्या मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘फुलवंती’ या सिनेमातून प्राजक्तानं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं. आता अभिनेत्री लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे.