Headlines

POP Ganesh Idols: पंतप्रधानांच्या आवाहनाचे काय? ‘पीओपी’प्रश्नी उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा – pm modi appealed to citizen during mann ki baat broadcast to install eco-friendly ganesh idols


POP Ganesh Idols: पंतप्रधानांनीच शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, असे जनहित याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणले होते.

ganeshotsav 2026
पीओपी मूर्ती(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आगामी गणेशोत्सवात शाडूच्या मातीने बनवलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन केले आहे. मग याविषयी राज्य सरकारची भूमिका काय आहे?’, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांना केली. त्यानुसार, उद्या बुधवारी महाधिवक्तांकडून राज्य सरकारची भूमिका मांडली जाणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) जलप्रदूषणाच्या कारणामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवलेल्या उत्सवमूर्तींवर पूर्णपणे बंदी आणणारी मार्गदर्शक तत्त्वे १२ मे २०२० रोजी आणली असताना, त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत रोहित जोशी यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी व शाडू मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांनी जनहित याचिका केली. तर, पूर्ण बंदीविरोधात ‘पीओपी’ मूर्तिकारांच्या काही संघटनांनी याचिका केल्या.

Maharashtra TimesRamesh Mhatre Case: डॉक्टर मारहाणीचा तपास उपायुक्तांकडे द्या! नगरसेवक रमेश म्हात्रेप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश
त्यानंतर ‘सीपीसीबी’ने आपल्या भूमिकेत बदल केल्याने राज्य सरकारने सहा फुटांवरील मूर्तींचे नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन करण्याचे धोरण आणले. या दोन्हीलाही जनहित याचिकाकर्त्यांनी ॲड. रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत सुधारित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या साऱ्याविषयी न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी होत आहे.

‘मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक नसून मार्गदर्शक सूचनांच्या स्वरूपात असल्याचे सीपीसीबीने गेल्या वर्षी स्पष्ट केले असल्याने पूर्ण बंदीच्या जनहित याचिकाकर्त्यांच्या मागणीला अर्थ उरत नाही. तरीही जलप्रदूषणाचा विचार करता, पुनर्प्रक्रियेचा उपाय राबवून टप्प्याटप्प्याने पुढील दोन-तीन वर्षांत समुद्र व अन्य नैसर्गिक जलप्रवाहांतील पीओपी मूर्तींचे विसर्जन थांबू शकेल’, अशी भूमिका यापूर्वी राज्य सरकारतर्फे मांडण्यात आली. तर, ‘वर्षानुवर्षे बंदीची अंमलबजावणीच होत नसून यापुढेही पीओपीला परवानगी दिल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल.

या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी रविवार, २६ जुलैच्या ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा शाडू मातीच्या मूर्तींच्या वापराचे आवाहन केले असल्याकडे खंडपीठाने महाधिवक्तांचे लक्ष वेधले आणि राज्य सरकारच्या भूमिकेबाबत विचारणा केली. तेव्हा, पुढील सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट करू, असे महाधिवक्तांनी न्यायालयाला सांगितले.

MPSC पेपरफुटी प्रकणामुळे आयोगावर प्रश्नचिन्ह, तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांचे मोठे आरोप

गतवर्षी भूमिकेत बदल का ?
‘सीपीसीबीच्या २०१० मधील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पीओपी मूर्तीबाबत थेट बंदी नव्हती. २०२० मधील मार्गदर्शक तत्त्वांद्वारे निर्मिती, विक्री व विसर्जन या तिन्हीवर बंदी आणण्यात आली. मात्र, त्याला आवश्यक वैधानिक आधार नाही. पूर्वी उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार, ती जारी करण्यात आली’, अशा स्वरूपाचा युक्तिवाद ‘सीपीसीबी’च्या वकिलांनी केला. तेव्हा, ‘तुमच्या त्या बंदीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राष्ट्रीय हरित लवाद, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचेही आदेश पूर्वी झाले. मग गेल्या वर्षीच राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यानंतर भूमिकेत बदल का केला?’, असा प्रश्न खंडपीठाने केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा