Headlines

Police make big revelation in family members death case iphone rumors debunked; आयफोनमुळे आत्महत्या? खवड्या डोंगर प्रकरणी सोशल मीडियावरील ‘त्या’ अफवेचा फुगा फुटला; डीसीपी रत्नाकर नवले यांचा मोठा खुलासा


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर आई-वडिलांसह मुलाने दरीत कोसळून केलेल्या आत्महत्येच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर केवळ आयफोन आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून वाद झाल्याने कुणालने हे टोकाचे पाऊल उचलले अशा चर्चांना प्रचंड उधाण आले होते. मात्र, या सर्व अफवांचे खंडन करत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. शुक्रवारी घटना घडताच स्थानिकांनी आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधला होता. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने खवड्या डोंगरावर पोहोचले. पोलिसांच्या अंमलदारांनी सलग पाच तास कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

​अडचणीत असशील तर सोडवू, पण आईच्या संवादातून वेगळाच सुगावा

डीसीपी रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस अंमलदार आणि आई यांच्यात जो संवाद झाला, त्यावरून हा प्रकार केवळ मोबाईलच्या वादातून घडलेला वाटत नाही. आई कुणालला वारंवार तू काही अडचणीत असशील तर आपण ती अडचण सोडवू असे सांगत होती. तिथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींपैकी कोणीतरी त्याला शांत करण्यासाठी ‘मोबाईल घेऊन देतो’ असे विधान केले होते. परंतु, त्या एका वाक्यावरून ‘आयफोनसाठीच आत्महत्या केली’ या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही.

​घरात साक्षीदारच उरला नाही; तपासाचे मोठे आव्हान

या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे घरातील खरी वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता कोणताही साक्षीदार शिल्लक राहिलेला नाही. कुणाल काही कारणास्तव प्रचंड तणावात होता, हे स्पष्ट आहे; मात्र त्याचा वाद नक्की कोणाशी आणि काय कारणावरून झाला होता, हे तपासातच समोर येईल.

​”सोशल मीडियावरील ‘आयफोन’च्या अफवांवर विश्वास ठेवू नका”

“आयफोन किंवा मोबाईलच्या हप्त्यांवरून कुणालने आत्महत्या केली, असे आपण सध्या अजिबात म्हणू शकत नाही. आत्महत्येमागे एकच कारण होते की अनेक कौटुंबिक वा आर्थिक कारणे होती, हे पोलीस तपासातूनच उघडकीस येईल. नागरिक आणि सोशल मीडियाने अशा कोणत्याही बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत