Padmashree d y patil passes away at the age of 90 monumental contributions in education health and sports; शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Padmashree d y patil passes away at the age of 90 monumental contributions in education health and sports; शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूर: शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीप्रत व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला आहे.
कोरोना काळानंतर कोल्हापुरातील निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील हे वास्तव्यास असत. मागच्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. मात्र त्यातून ते सावरत होते. अशातच 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या ‘यशवंत निवास’ (कसबा बावडा, कोल्हापूर) येथे ठेवण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूरकरांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता येईल.
22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला होता. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. 1983 मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची स्थापना केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे 3 हून अधिक डीम्ड विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत, जिथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
डॉ. डी. वाय पाटील यांची सार्वजनिक जीवनातील सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून झाली. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान म्हणून त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, तसेच त्यांनी पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट आणि शिवाजी विद्यापीठाकडून ‘डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली होती.
5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून डॉ. पाटील यांची अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (लाईन बाजार, कसबा बावडा) च्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा