Headlines

PM Modi: इराणकडून PM मोदींना विशेष आमंत्रण, भारताची विचित्र कोंडी; 2024 ची पुनरावृत्ती होणार?


PM Modi: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळत चालला आहे. दोन्ही देशांमधील चर्चा सकारात्मक आहे. त्यामुळे जगाला दिलासा मिळाला आहे. या सगळ्या स्थितीत इराणच्या आमंत्रणानं भारताची गोची झाली आहे.

modi iran
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हवाई हल्ले केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. त्यांच्या पार्थिवावर अद्याप अंत्यविधी झालेले नाहीत. ते लवकरच होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यविधी होतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित राहावं अशी इराण सरकारची इच्छा आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी याबद्दल मोदी यांना आमंत्रण दिलं आहे. खामेनी यांना मृत्यू २८ फेब्रुवारीला झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोणताही शोक संदेश जारी केला नव्हता. त्याची बरीच चर्चा त्यावेळी झाली होती. यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारत सरकारच्या वतीनं शोक पुस्तिकेवर स्वाक्षरी केली. त्यासाठी मिसरी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात गेले होते.
Maharashtra TimesUS Iran Deal: होर्मुझबद्दल इराणचा मोठा निर्णय; बदल्यात अमेरिकेकडून विशेष सवलत जाहीर, भारताला गुड न्यूज
इराण भारताचा जुना मित्र असल्यानं अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदी शोक संदेश जारी करतील, असं मानलं जात होतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता इराणच्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणानंतर मोदी नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इराणच्या आमंत्रणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर विचित्र कोंडी झाली आहे.

याआधी मे २०२४ मध्ये इराणचे तत्कालीन राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतानं एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. रईसी यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी भारतानं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. त्याचं नेतृत्व तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं होतं.
Maharashtra TimesUS Iran Deal: हा तर विश्वासघात! संतप्त इराणकडून मोठी घोषणा; USसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग पुन्हा दाटले
अली खामेनी यांच्या पार्थिवावर मृत्यूनंतर ४ महिन्यांनी अंत्यविधी होत आहेत. ४ जुलैपासून तेहरानच्या ग्रँड मोसाला संकुलात त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. यानंतर तेहरान आणि कोम शहरांमध्ये अंत्ययात्रा काढण्यात येतील. नजफ आणि कर्बला या पवित्र शहरांमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जातील.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा