Headlines

Petrol Diesel Rule Change from 1 July in India; पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती


Petrol Diesel Rules Changes: इराण आणि अमेरिका करार, होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा पूर्ववत होताच भारतातील तेल आणि गॅसबाबत निर्माण झालेला संकटाची परिस्थितीही सामान्य होताना दिसत आहे. हळूहळू परदेशातून होणारा इंधनाचा पुरवठा पूर्ववत होताना सरकारने आता उद्या म्हणजे 1 जुलैपासून व्यावसायिक ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ खरेदीवरील सर्व निर्बंध तात्पुरता हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Petrol Diesel Commercial Sale Restrictions Lifted
1 जुलैपासून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याचे नियम बदलणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : तुम्ही व्यावसायिक वापरासाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. येत्या काही तासांत 1 जुलैपासून व्यावसायिक ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ विक्रीवरील निर्बंध हटवले जाणार आहेत. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणून निर्बंध लादले गेले होते. सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे व्यावसायिक खरेदीदारांचा खर्च कमी होईल.

1 जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीचा नियम बदलणार

पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन पुरवठा कमतरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जून महिन्यात सरकारने व्यावसायिक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करण्यावर बंदी घातली होती, तर डिझेल विक्रीवरही प्रति ग्राहक किंवा वाहन प्रति दिन 200 लिटरची मर्यादा लादण्यात आली होती. संभाव्य पुरवठा संकटाच्या काळात देशात इंधनाची कमतरता टाळण्यासाठी सरकारने पाऊल उचलले होते, पण आता परिस्थितीत सुधारण्याची चिन्हे दिसू लागल्यावर सरकारने जनतेपर्यंत फायदा पोहोचण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Maharashtra TimesCash At Home: घरात 100-200 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात; लोकांची सवय अचानक का बदलली? करोनाशी कनेक्शन
अशाप्रकारे, सरकारच्या या निर्णयानंतर 1 जुलैपासून व्यावसायिक खरेदीदार (म्हणजे बस/ट्रक मालक) पेट्रोल पंपांवरून थेट किरकोळ दरात तेल खरेदी करू शकतील, ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल.

दररोज 200 लिटरची मर्यादा निश्चित केलेली

होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर सरकारने व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ विक्री केंद्रांमधून इंधन खरेदी करण्यास बंदी घातली होती तर, डिझेलच्या खरेदीवर प्रति ग्राहक किंवा एका वाहनामागे दररोज 200 लिटरपर्यंत मर्यादित घातली गेली होती. मध्यपूर्वेतील तणावामुळे पुरवठा साखळी धोक्यात आला स्थानिक पातळीवर तुटवड्याची चिंता वाढल्याने सरकारने बंधन लादलेले. पेट्रोल आणि डिझेलची समान उपलब्धता सुनिश्चित करणे, गैरवापर आणि साठेबाजी रोखणे, तसेच वाजवी दरात इंधनाचा अखंड पुरवठा कायम ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने जून महिन्यात निर्बंध लादलेली.
Maharashtra TimesGold Price Fall Today: सुवर्ण बाजाराचा ‘ट्रेंड’ बदलला! ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जागतिक घडामोडींचा देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांवर परिणाम
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील तणावाच्या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांवर दिसून आला. या 3 कंपन्यांकडे देशातील 1 लाखापेक्षा जास्त पेट्रोल पंपांपैकी सुमारे 90% पंपांची मालकी आहे.

दुसरीकडे खाजगी कंपन्या बाजारभावाप्रमाणे इंधनाची किंमत ठरवत होत्या, त्यामुळे कंपन्यांमधील डिझेलची विक्री घटली, तर सरकारी मालकीच्या पेट्रोल पंपांवरील विक्री झपाट्याने वाढू लागली. यामुळे अनेक भागांमध्ये इंधनाच्या उपलब्धतेवर दबाव निर्माण झाला.

सरकारने निर्बंध हटवण्याचे कारण काय
भारत जगातील शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचा निव्वळ निर्यातदार आहे. तब्बल तीन महिन्यांहून जास्त काळ चाललेल्या मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलची अखंड उपलब्धता कायम ठेवण्यासाठी सरकारने तात्पुरते निर्बंध लादलेले. देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सामान्य झाला आणि कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नसल्याचे सुनिश्चित करून सरकारने निर्बंध हटवले. परिणामी, 1 जुलैपासून सर्व तात्पुरते निर्बंध उठवले, ज्यामुळे व्यावसायिक खरेदीदारांना नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याची सूट मिळेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा