Headlines

राम मंदिर चोरी- अयोध्येत UP काँग्रेस अध्यक्ष नजरकैदेत:काँग्रेस नेते हाऊस अरेस्ट; CCTV निगराणीस तैनात अधिकाऱ्याची 17 वर्षांनी बदली




अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता अयोध्या येथील एका हॉटेलमध्ये नजरकैद केले आहे. अजय राय यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ देणगी चोरीचा निषेध करण्यासाठी येथे आले होते. त्यांनी आज म्हणजेच मंगळवारी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे, ते रात्रीच अयोध्येला पोहोचले होते. दुसरीकडे, अजय राय यांच्या पत्नी रीना राय यांनी वाराणसीतून एक व्हिडिओ जारी केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे- माझ्या पतीचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. पोलिसांच्या जीपमध्ये घेऊन गेल्यानंतर आता आमच्या सहकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन भ्रमित केले जात आहे. ‘देणगी चोरांविरुद्ध’ लढा सुरूच राहील. माझ्या पतीला काहीही झाले, तर याची संपूर्ण जबाबदारी या अधर्मी भाजप सरकारची असेल. १७ वर्षांनंतर RMO बदली; सीसीटीव्ही देखरेखीची होती जबाबदारी चंपत राय यांची ३ तास ​​चौकशी; अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात अपयश राम मंदिर देणगी चोरीशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉगमधून जा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत