Headlines

Passenger Falls On Track While Boarding Moving CSMT Pune Express At Karjat Dramatic Rescue Caught On Camera | रेल्वे कर्मचारी देवासारखा धावून आला, मृत्यूच्या दाढेतून प्रवाशाला काढलं बाहेर, धावती ट्रेन पकडताना पडला होता ट्रॅकवर


Mumbai Railway Viral Video: कर्जत रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रॅकवर पडला. सुदैवाने रेल्वे कर्मचाऱ्यानं तातडीने लाल सिग्नल दाखवला आणि ट्रेन थांबवली. या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेचा CCTV व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Railway Accident Video
(फोटो सौजन्य – @drmmumbaicr/x.com)
धावती गाडी पकडू नका, ही सूचना प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. कारण तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. पण लोक काही ऐकत नाहीत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका प्रवाशानं CSMT-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण बिचाऱ्याचा तोल गेला आणि तो फलाट आणि गाडीच्या मधल्या गॅपमधून थेट खाली पडला. पण हा अपघात प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यानं पाहिला आणि त्वरित प्रसंगावधान दाखवत लाल सिग्नल दाखवून गाडी थांबवली आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. हा अपघात प्लॅटफॉर्मवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कसा झाला अपघात?

हा व्हिडीओ @drmmumbaicr या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना कर्जत रेल्वे स्थानकावर घडली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, CSMT-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. पण त्याचं नशीब चांगलं की हा अपघात पॉइंट्समन सौरभ कुमार सिंह यांनी पाहिला. अन् त्यांनी लगेचच प्रसंगावधान दाखवत ट्रेन मॅनेजरला लाल सिग्नल दाखवला आणि ट्रेन त्वरित थांबली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी, RPF अधिकारी आणि इतर प्रवाशांनी मिळून त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढलं. या अपघातात प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. पण जर का रेल्वे कर्मचाऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं नसतं, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. त्यामुळे जणू मृत्यूच्या दाढेतून तो परत आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

रेल्वे कर्मचाऱ्यांचं केलं जातंय कौतुक

हा व्हिडीओ आतापर्यंत २४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय. अशा बेशिस्त प्रवाशांवर काहीतरी कारवाई करा, जेणेकरून अशा चुका ते पुन्हा करणार नाहीत, अशी विनंतीदेखील प्रशासनाला केली आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा