विशेष म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्या आजोबांचे किंवा आई-वडिलांचे जुने पेपर शेअर्स असतील तर तुम्ही त्या रक्कमेवर आताही अधिकार मिळवू शकता. त्या पेपर शेअर्सचा वारसाहक्क मिळवण्यासाठी मूळ गुंतवणूकदाराचे हयात असणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, जर पेपर शेअर्स आजोबांचे असतील आणि आजोबांचा मृत्यू झाला असेल तरीही तुम्ही त्या पेपर शेअर्सला तुमच्या Demat खात्याशी जोडू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे दस्तऐवज असणे बंधनकारक असणार आहे.
पेपर शेअर्सला Demat खात्याशी जोडण्यासाठी आवश्यक दस्तऐवज कोणते?
जर आजोबांचे कागदी शेअर्स तुमच्याकडे आहेत. तर ते तुमच्या Demat खात्याशी जोडून घेण्यासाठी काही महत्वाच्या दस्ताएवजांची गरज भासू लागते. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे वारसाहक्क सिद्ध करावे लागेल. सेबीच्या नियमांनुसार, मृत गुंतवणूकदाराचे शेअर्स वारसाहक्क म्हणून नॉमिनी तसेच कायदेशीर वारसाला मिळणे शक्य आहे पण त्यासाठी कायदेशीर वारसाहक्क सिद्ध करावा लागतो. त्यासाठी कंपनीच्या आरटीएकडे अर्ज करावे लागते. शेअरधारकांच्या नोंदी आणि शेअर हस्तांतरण करण्याचे सर्व कार्य आरटीएच्या नियंत्रणाखाली येते.
अर्ज करताना आवश्यक त्या दस्तऐवजांची पुष्टी करावी लागते. या दस्तऐवजांमध्ये आजोबांचे पेपर शेअर्स प्रमाणपत्र, आजोबांचा मृत्यूचा दाखला, अर्जकर्त्याचा पॅन कार्ड, केवायसी प्रूफ, ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म (वारसाने शेअर आपल्या नावे करण्यासाठी केलेल्या अर्ज) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अर्जकर्त्याला 1 एप्रिल 2019 पूर्वीच ट्रान्सफर deed ही सादर करावे लागते. त्याचसह अर्ज कर्त्याच्या Demat खात्यासंबंधित cml ही सादर करावे लागते. त्याच बरोबर आवश्यकतेनुसार इतर काही महत्वाच्या दस्तऐवजांची गरजही भासू शकते.
पुरवण्यात आलेल्या दस्तऐवजांची पडताळणी झाल्यावर पात्र अर्जदाराच्या Demat खात्याशी जुने कागदी शेअर्स जोडण्यात येते.
TATA Leadership Feud: एन. ‘चंद्रा’च्या राजीनाम्यामुळे TATA समूहात मोठं वादळ, सत्तासंघर्ष तीव्र, नोएल टाटा निवडणार साम्राज्याचा पुढचा किंगमेकरअर्ज कर्त्याने लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी!
अनेकदा जर एखाद्या शेअर्सवर मोठ्या काळापासून कुणी दावा करत नसेल किंवा एखादा शेअर्स गेल्या अनेक काळापासून बेवारस दिसून येत असेल तर अशावेळी ते शेअर्स IEPF च्या नियंत्रणाखाली येते. IEPF कडे शेअर्स गेले तर ते पुन्हा मिळवणे कठीण होऊ शकतात. पेपर शेअर्स Demat खात्याशी जोडण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत, आधी एखाद्या योग्य व्यक्तीच्या नावावर शेअर्सची मालकी निश्चित करण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या Demat खात्याशी ते शेअर्स जोडले जातात, त्यानंतरच त्या व्यक्तीला त्या शेअर्ससंबंधित व्यवहार करण्याचे अधिकार मिळतात.

