Headlines

Pandharpur Ashadhi Ekadashi Police Jawan Rameshwar Sabne Ended his Life Shooting himself Own Revolver; बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:च्या रिवाल्वरमधून गोळी झाडली; विठूरायाच्या पंढरीत खळबळ


Pandharpur Police Rameshwar Sabne Ended his Life : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये सगळीकडे भक्तीचं वातावरण असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे.

Pandharpur Police Rameshwar Sabne Ended his Life
पंढरपूर पोलीस रामेश्वर साबणे गोळी झाडून आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर (पंढरपूर), अरुण बाबर : यंदाच्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर दिसत आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पोलिसाने गोळी झाडून आयुष्य संपवलं. कामाच्या तणावातून या पोलिसाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून घेत या पोलिसाने स्वत:चं आयुष्य संपवलं. पंढरपुरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसाने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून जवानानं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते मूळचे परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी आहेत.
Maharashtra TimesAhilyanagar Accident : पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; कर्ता लेक गेल्यानं कुटुबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश

स्वतःच्या रिवाल्वरमधून गोळी झाडली

ही दुर्दैवी घटना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली आहे. रामेश्वर साबणे हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. आषाढी यात्रेनिमित्ताने ते तीन ते चार दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : खिचडीत जिवंत अळी तर बिर्याणीत माशी, नागरिकांच्या जीवाशी खेळ, मालकांचे धाबे दणाणले; FDA कडून नांदेडमध्ये प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द

मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवो आणि जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा