Pandharpur Ashadhi Wari: प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी साधारण २२ लाख भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत होते.

पददर्शनाची रांग सुमारे १२ किलोमीटर लांब गेली होती. ही रांग फिरून जात असल्यामुळे भाविकांना बरीच पायपीट करावी लागली. भाविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केले होते. तथापि, यावर्षी भाविकांची संख्या तुलनात्मक जास्त असल्याने दर्शनासाठी वेळ लागल्याचे दिसून आले.
Pandharpur | पंढरपुरात आषाढी वारीनिमित्तानं व्हिआयपी दर्शन बंद तर रांगेतील भक्तांसाठी खास सोय-सुविधा
दहा दर्शन मंडप
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पददर्शन रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे दहा दर्शन मंडप उभे केले होते. दर्शन मंडपामध्ये भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन याची सुविधा करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन सुविधेची पाहणी केली होती. यानंतर पंढरपुरात आल्यानंतरही त्यांना सुविधेची पाहणी केली . भाविकांची चांगली सोय केल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या कामाचे कौतुक केले.
भाविकांची पायपीट
पददर्शनाची रांग यंदा विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयपर्यंत म्हणजे मंदिरापासून बारा किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यामुळे भाविकांना जाण्यासाठी बारा किलोमीटर व परत येण्यासाठी बारा किलोमीटर अशी २४ किलोमीटर पायपीट करावी लागली.
Jayant Patil: अर्थमंत्रिपदासाठी स्पर्धेत? एनडीएत सहभागी होणार? राज्यभर उठलं चर्चांचं मोहोळ; जयंत पाटलांनी क्षणात सगळं थांबवलं!कॉरिडॉरच्या कामात योग्य पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री
‘श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर वर्षी वाढणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची सरकारी महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली . त्या वेळी ते बोलत होते.

