Headlines

Palghar Talasari 19 Years old Woman Assault by Six men while returning with Friend Crime News; मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, तलासरी येथे सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं


Palghar Woman Assault : मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी परत येत असताना त्यांची मोटरसायकल बंद पडली. तिथे दोन मोटरसायकलींवर सहा जण उभे होते. त्यांनी तिला जबरदस्तीने बाईकवर बसवून तलासरीतील निर्जन बंगल्यात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

Talasari Maharashtra Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पालघर : मित्रासोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सहा जणांनी पाशवी सामूहिक अत्याचार केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली, तर इतरांचा शोध सुरु आहे.

बंगल्यात ओढून नेत अत्याचार

पीडित तरुणी मैत्रिणीच्या घरी राहत होती. ती आपल्या मित्रासोबत ९ ऑगस्टला गुजरातला गेली होती. त्याच दिवशी परतीच्या प्रवासात रस्त्यात त्यांची मोटरसायकल बंद पडली. त्या ठिकाणी दोन मोटरसायकलींवर सहा जण उभे होते. त्यांनी तिला जबरदस्तीने मोटरसायलकवर बसवून तलासरीतील निर्जन बंगल्यात नेले. येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

सोबतचा मित्र भीतीने पळाला

यानंतर पीडितेने तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन जणांना अटक केली. इतर आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तरुणीवर अत्याचार होत असताना तिचा मित्र भीतीने पळून गेला. नंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पीडितेने सहा जणांची नावंही सांगितली

पीडितेने पोलिसांना सहा जणांची नावे सांगितली. प्राथमिक तपासात त्यापैकी पाच जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रत्येक संशयिताचा अत्याचारातील सहभाग स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी येथे भेट देऊन तपास जलद गतीने सुरू असल्याचे सांगितले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून घटनेतील प्रत्येक संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

तलासरीसारख्या ग्रामीण आणि संवेदनशील भागात तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने नेऊन अत्याचार केल्याच्या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. निर्जन परिसरांमध्ये पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही व्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

मिरा रोडमध्ये भररस्त्यात तरुणीवर अत्याचार

दरम्यान, हॉटेलमध्ये जेवून घरी जात असताना एका तरुणीवर भररस्त्यात अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मिरा रोड येथे समोर आला आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून २८ वर्षीय टॅक्सीचालक सुजित शर्मा याला अटक केली आहे.

Maharashtra TimesAdvait Upadhyay : चार महिन्यांवर लग्न, होणाऱ्या पत्नीला सेल्फी पाठवून बेपत्ता, ड्रोनमध्ये टेकडीजवळ ‘बॉडी’ दिसली, 31 वर्षीय अद्वैतचे बरेवाईट झाल्याची भीती
मिरा रोडच्या काशिमिरा भागात राहणारी २४ वर्षीय पीडिता रविवारी रात्री काही सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. जेवणानंतर सहकाऱ्यांनी तिला हिराको इमारतीलगत रस्त्यावर मुख्य रस्त्याजवळ सोडले. त्यानंतर ती घरी जात असताना मागून आलेल्या सुजितने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. सुजितने तिच्या गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढला. यानंतर पीडितेने काशिमिरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीआधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. सोमवारी मध्यरात्री सुजितला अटक झाली.

परतवाडा फाइल्स; सूत्रधार अयानला जामीन

दुसरीकडे, अमरावतीतील परतवाडा येथे अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत करणे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ने त्याला जामीन मंजूर केला. यापूर्वी या प्रकरणातील अन्य सात आरोपींची जामिनावर सुटका झालेली आहे.

Maharashtra TimesAir India Turbulence : गांजा ओढून पायलट ‘हवेत’? एअर इंडिया विमान प्रकरणात प्राथमिक संशय, अमली पदार्थ सेवन चाचणी पॉझिटिव्हफेब्रुवारी महिन्यात परतवाडा येथे हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आरोपींनी अल्पवयीन मुलींशी जाणीवपूर्वक जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते व्हायरल केल्याचा आरोप होता. याप्रकरणी तीन पीडित तरुणींनी हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार नोंदवली होती, तर उर्वरित पीडिता पुढे आल्या नाहीत. तरीही पोलिसांनी कसून तपास करत एकूण आठ जणांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी तपासातील त्रुटी, ठोस पुराव्यांचा अभाव आणि तपासातील सहकार्य या मुद्द्यांवर युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा