Headlines

Pakistani Man Claims to Be Indian Chinese Comedian Exposes Him in Seconds Video Viral | भारतीय सांगून चिनी तरूणीला मारत होता मिठी, एका सोप्या प्रश्नानं पाकिस्तानी झाला एक्सपोझ, व्हिडीओ पाहून तुमचाही पारा चढेल


Viral Instagram Video: स्टँड-अप शोदरम्यान एका पाकिस्तानी तरुणाने स्वतःला भारतीय असल्याचं सांगत तरुणीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तरुणी हुशार निघाली. तिने एक साधा प्रश्न विचारून त्याचा खोटेपणा उघड केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

New Project (1)
भारत विरुद्ध पाकिस्तान हे संबंध किती तणावपूर्ण आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, कला अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसतात. अशाच पार्श्वभूमीवर एका स्टँड-अप शोमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी तरुणाने भारताचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका चिनी तरुणीने विचारलेल्या साध्या प्रश्नामुळे त्याचा खोटेपणा उघड झाला. अखेर त्याने आपण पाकिस्तानी असल्याची कबुली दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्याची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
(फोटो सौजन्य – katehucomedy/Instagram)

नेमकं घडलं काय?

​ ​

हा व्हिडीओ katehucomedy या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिनी तरुणी स्टँड-अप कॉमेडी करताना दिसते. दरम्यान, प्रेक्षकांमध्ये बसलेला एक तरुण वारंवार तिच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर ती त्याच्याशी हस्तांदोलन करते. मात्र, त्यानंतर तो थोडा पुढे येत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तरुणी थोडी अवघडते आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी त्याच्याशी संवाद साधते.

ती त्या तरुणाला विचारते, “तू कुठून आला आहेस?” त्यावर तो “भारतातून” असल्याचं सांगतो. त्यानंतर तरुणी त्याला विचारते, “भारतातील कोणत्या राज्यातून? कारण माझा बॉयफ्रेंडही भारतीय आहे.” मात्र, या प्रश्नाचं उत्तर त्या तरुणाला देता येत नाही. अखेर त्याने आपण पाकिस्तानचा नागरिक असल्याची कबुली दिली.

व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

​ ​

हा व्हिडीओ १ लाख ७६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. वरकरणी हा प्रकार गंमतीशीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात हे थोडंसं गंभीर प्रकरण आहे. जर त्या स्टँड-अप करणाऱ्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत त्याला उलट प्रश्न विचारला नसता, तर या तरुणाच्या वागण्यामुळे भारताचं नाव बदनाम झालं असतं. वास्तविक, असे प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये अनेकदा घडत असल्याचं म्हटलं जातं. भारतीय आणि पाकिस्तानी दिसायला बऱ्याचदा सारखे वाटतात. त्यामुळे काही पाकिस्तानी नागरिक नियमांचं उल्लंघन करून आपण भारतीय असल्याचा दावा करतात, असाही दावा काहीजण करत आहेत. असो, हा व्हिडीओ पाहून तुमच्या मनात काय विचार आले? तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा