दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी इतका आग्रही का आहे? याचे संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत होते. यामागे त्यांचा हेतू काय आहे? आता याच खरं कारण समोर आलं आहे. होय, पाकिस्तान खरोखरच ब्रोकरची भूमिका बजावत होता ज्याची आता त्याला किंमत मिळू शकते.
Gold Price Fall: सोने आले स्वस्ताई घेऊन, सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर भावात घसरण; चांदीचे दर ‘जैसे थे’च, पाहा नवीन दर काय
पाकिस्तान प्रत्यक्षात युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत नव्हता तर केवळ आपला लपलेले हेतू साध्य करू पाहत होता. पाकिस्तानला गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करावे लागत असून भारताच्या कट्टर शत्रूने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून ते जागतिक बँकेपर्यंत प्रचंड कर्ज घेतले आहे, पण इतकं करूनही अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत नाही.
पाकिस्तानच्या हातात पुन्हा भिकेचा कटोरा
याच कारणामुळे पाकिस्तानच्या हातात पुन्हा भिकेचा कटोरा आला आहे. शहबाज शरीफच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारने आता अमेरिकेकडून 10 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 964.92 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली असून या संदर्भात पाकिस्तानी अर्थमंत्र्यांनी अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांची भेटही घेतली.
पाकिस्तानला अमेरिकेकडून मदतीची आशा
सूत्रांचा हवाला देऊन रॉयटर्सने सांगितले की पाकिस्तानने ढासळत्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने अमेरिकेकडे $10 अब्जच्या मदतीची विनंती केली, जी मंजूर झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. याआधी पाकिस्तानने अमेरिका-इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्ती केली, ज्यामुळे भारताच्या शेजाऱ्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंटना मदतीच्या विनंतीत पाकिस्तानने 10 अब्ज डॉलर्सच्या बायलेटरल एक्सचेंज स्टॅबिलायझेशन सपोर्ट फॅसिलिटीची मागणी केली, ज्याची मुदत पाच वर्षांची असेल. या सुविधेमध्ये करन्सी स्वॅप, आर्थिक हमी आणि कर्जांचा समावेश असू शकतो.
अमेरिकेने पाकिस्तानची मागणी मान्य केल्यास यामुळे केवळ पाकिस्तानचा राखीव निधीच वाढणार नाही, तर पाकिस्तानी चलनही मजबूत कारण्याद मदत होईल. या प्रकरणी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तानात इंधन दरवाढीचा भडका
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला विराम लागण्याच्या उद्देशाने क्रूडच्या किमतीत गेल्या काही दिवसांत प्रचंड नरमाई दिसून आलेली ज्याचा मागोवा घेत पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या गेलेल्या. पण आता बेहाल पाकिस्तानी जनतेला पुन्हा एकदा महागाईचा चटका बसला.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या अहवालानुसार सरकारने बुधवारी पेट्रोलच्या दरात 6.39 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेलचा दर 7.83 रुपये लिटरनी वाढला. अशाप्रकारे, अलीकडच्या दरवाढीनंतर पाकिस्तानात पेट्रोलचा भाव 327.12 पाकिस्तानी रुपये लिटर आणि हाय-स्पीड डिझेलचा भाव 375.04 पाकिस्तानी रुपये लिटर झाला आहे.

