एकमेकांचा आदर, अनुकूल मांडणी आणि भविष्यातील राजकारणाचा वेध, ठाकरे-आंबेडकर युती राजकीय समीकरणे बदलणार?
मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कडव्या हिंदुत्त्ववादी अजेंड्याला शह देण्यासाठी गेल्या काही दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्याकडून अत्यंत नियोजनबद्ध पावले टाकली जाताना दिसत आहेत. आमचे हिंदुत्त्व हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही, असा उच्चार वारंवार करत उद्धव ठाकरे बहुजनवादी हिंदुत्त्वाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण…
