निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी
हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…
