मातोंडच्या उपसरपंचपदी वैभवी परब बिनविरोध
मातोंड/ प्रतिनिधी : मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैभवी परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाल्याने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा करिष्मा पाहायला मिळाला.उपसरपंचपदासाठी सौ. वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाच्या सूचक म्हणून सौ. किशोरी परब…
