Headlines

Om Puri : ‘त्यांचं मोलकरणीसोबत अफेअर होतं, तरी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’, ओम पुरींबद्दल एक्स पत्नीचा दावा; म्हणाली, ‘खूप उशीर झालेला’


Om Puri Ex Wife : ओम पुरी यांची एक्स पत्नी सीमा कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये ओम पुरी यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Seema Kapoor On Om Puri Affair With Maid
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कधीकधी, बॉलिवूडमधील सर्वात वाईट घटना केवळ पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही घडतात. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलंय. त्यांची पहिली पत्नी सीमा कपूर प्रेग्नन्ट होती, त्यावेळेस ओम पुरी यांचं दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर होतं. तसेच लग्नाच्या आधी अभिनेत्याचं मोलकरणीसोबतही अफेअर होतं. याबद्दल ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

सीमा यांनी सांगितलं की, ‘१९८९ मध्ये आमचा साखरपुडा झाला. नेमकं काय कारण होतं हे मला माहीत नाही, पण दोन्ही कुटुंबांनी आमच्या लग्नासाठी खूप घाई केली. अन्नू भैया तेव्हा शूटिंगसाठी बाहेर गेले होते. आपल्या लाडक्या बहिणीचा साखरपुडा झाल्याचं त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडून समजलं, त्यामुळे ते खूप नाराज झाले होते. त्या काळात मोबाईल किंवा फोन सहज उपलब्ध होत नव्हते.’
Maharashtra TimesNauheed Cyrusi : दोन गर्भपात अन् अभिनेत्रीनं घेतला आई न होण्याचा निर्णय; म्हणाली, ‘फक्त मुलांना जन्म देणं हा आयुष्याचा उद्देश नाही’

ओम पुरी यांचं मोलकरणीसोबत अफेअर

सीमा पुढे म्हणाल्या की, ‘लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी ओम यांनी मला घरातील मोलकरणीसोबतच्या त्यांच्या अफेअरबद्दल सांगितलं. पण, ते सगळं असूनही आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खूप उशीर झाला होता. शेवटच्या क्षणी लग्न मोडणं शक्य नव्हतं. सर्व पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि स्वागत समारंभाचीही तयारी झाली होती. आम्ही झालावाड या छोट्या शहरात होतो, जिथे माझ्या आई-वडिलांचा खूप सन्मान केला जायचा. ते मला नदीकिनारी एका बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले की, त्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न मोडण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. आजकालच्या महिला अधिक धाडसी आहेत. काही जणी तर लग्नाच्या दिवशीही चुकीचा निर्णय वाटला, तर माघार घेतात.’ असं सीमा यांनी पुढे सांगितलं.
Maharashtra TimesDivya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग
ओम पुरी यांना घटस्फोट देताना सीमा यांना खूप त्रास सहन करावा लागला. यामध्ये त्यांनी आपल्या होणाऱ्या बाळालाही गमावलं. सीमा कपूर यांनी सांगितलं की, घटस्फोटाच्या वेळी ओम पुरी यांनी त्यांना ६ लाख रुपयांची पोटगी दिली होती. इतकंच नव्हे तर बाळ गमावल्यानंतर ओम पुरी सीमा यांना धीर देण्यासाठी किंवा बघायला गेले नाहीत. ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीमा कपूर बोलत होत्या.
Maharashtra TimesSooraj Pancholi : ‘मी २० वर्षांचा होतो, या खटल्याच्या ओझ्याखाली जगलो’ जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका, अभिनेता भावूक
दरम्यान, ओम पुरी आणि सीमा यांचं १९९० मध्ये लग्न झालेलं. पण, काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९९३ मध्ये ओम पुरी यांनी नंदिता पुरीसोबत दुसरं लग्न केल. पण, हे लग्नही फार काळ टिकलं नाही आणि २०१३ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा