आधी जुनी पेन्शन पद्धत समजून घेऊ
ओल्ड पेन्शन स्कीम (OPS) ही पेन्शन पद्धत 2004 पूर्वीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होते. या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या आधीच्या मासिक वेतनाला लक्षात घेतले जाते. त्यानंतर त्यावेळच्या पेन्शन नियमांनुसार अंतिम वेतनाचे गणित आखले जाते. ती रक्कम कर्मचाऱ्याला आयुष्यभर दरमाह पेन्शन म्हणून पुरवण्यात येते. विशेष म्हणजे या पेन्शन योजनेला अंत नाही. अगदी कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. तसेच काही वेळी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबालाही पेन्शन दिली जाते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीआधी 50,000 रुपये इतका पगार आहे. तसेच त्यावेळी पेन्शन नियमानुसार पेन्शनचा दर ‘मासिक वेतनावर 25%’ असा आहे. तर 50,000 रुपयांवरती 25%, 12,500 रुपये इतकी रक्कम येते. एकंदरीत, कर्मचाऱ्याला दर माह 12,500 इतकी रक्कम अगदी मृत्यूपर्यंत मिळेल. तसेच त्यासह Dearness Relief म्हणून अतिरिक्त भत्ताही मिळतो.
NPS मध्ये पेन्शनची रक्कम कशी ठरते?
NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी क्षेत्रात भरती झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला NPS या प्रकारात मोजले जाते. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारा पेन्शन हा NPS या नव्या पद्धतीद्वारे मोजला जाणार. NPS मध्ये कर्मचाऱ्याने कमावलेली रक्कमच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते.
कर्मचाऱ्याचे NPS खाते असते. या खात्यात कर्मचाऱ्याकडून तसेच नियोक्त्याकडून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम खात्यात टाकली जाते. ती रक्कम NPS च्या नियमांनुसार गुंतवली जाते. त्यावर होणारा नफा कर्मचाऱ्याच्या NPS खात्यात जमा होत राहतो. जेव्हा कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीची वेळ येते. तेव्हा कर्मचाऱ्याच्या NPS खात्यात जमा असणाऱ्या एकूण रक्कमेला Corpus म्हणतात.
उदाहरणार्थ, सेवानिवृत्तीवेळी कर्मचाऱ्याच्या NPS खात्यात एकूण 50 लाख रुपयांची रक्कम असेल तर ती रक्कम Corpus म्हणून ओळखली जाते.
कर्मचाऱ्याला गरजेनुसार एक ठराविक रक्कम ( पूर्ण Corpus नाही ) Lump Sum मध्ये काढता येते. त्यानंतर NPS खात्यात उरलेल्या रक्कमेला Annuity साठी गणले जाते. Annuity म्हणजेच NPS च्या पेन्शन व्यवस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला मिळणारी दरमाह पेन्शनची रक्कम.
उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याच्या खात्यात 50 लाख रुपये रक्कमेचे Corpus आहे. त्यातील एक ठराविक रक्कम ( पूर्ण Corpus नाही ) कर्मचाऱ्याला Lump Sum मध्ये काढता येऊ शकते. एकंदरीत, कर्मचाऱ्याने 50 लाख रुपये रक्कमेतून 30 लाख रक्कम Lump Sum मधून काढून घेतली तर उरलेल्या 20 लाखांपासून Annuity गणली जाते. जर Annuity Rate 2% असेल. तर 20 लाखांवर 2% म्हणजे दरमाह Annuity ( दरमाह पेन्शनची रक्कम ) 40,000 मिळेल.
हे Annuity Rate कोण ठरवतं?
दादागिरी करता-करता अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार! आखाती देशांनाही मागे टाकलेपेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी ( PFRDA ) ही NPS या पेन्शन व्यवस्थेचे नियमन करणारी संस्था आहे. तसेच देशातील विविध लाइफ इन्शुरन्स कंपनी Annuity Service Provider (ASP) म्हणून कार्य करतात.
एकंदरीत, जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याच्या खात्यात जमा असणाऱ्या Corpus ला Annuity मध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्याला एका APS ची निवड करावी लागते. APS ची निवड करण्याचे पूर्ण हक्क कर्मचाऱ्याला असतात. APS म्हणजे LIC, SBI Life, HDFC Life अशा लाईफ इंश्युरन्स कंपन्या. प्रत्येक कंपन्यांचे Annuity साठी वेगवेगळे प्लॅन्स आणि त्या प्लॅन्सनुसार Annuity Rate ठरलेले असतात. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार त्यातील एक APS त्यांच्या निवडीच्या प्लॅनसह निवडायचा असतो. तोच APS कर्मचाऱ्यांना दरमाह Annuity पुरवण्यासाठी जबाबदार असतो.
