विविध कारणांमुळे आयकर विभाग नोटीस पाठवते
जर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस आली असेल तर याला अनेक कारणे आहेत. अनेकदा तुम्ही ITR साठी दिलेली माहिती आणि आयकर विभागाकडे दिलेली माहिती, यांमध्ये तफावत आढळल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येते. TDS , AIS किंवा भरण्यात आलेले फॉर्म यांमध्ये नमूद केलेली माहिती वेगवेगळी असेल तर आयकर विभाग नोटीस पाठवते. जर जुनी कर थकबाकी असल्यास त्यांची पुष्टी करण्यात यावी या उद्देशाने आयकर विभागाकडून नोटीस येते. ITR कडे दिलेली माहिती चुकीची असल्यास किंवा अपूर्ण असल्यास करदात्याला नोटीस येते.
आयकर विभागाने जर नोटीस पाठवली तर यात घाबरण्याचे कारण नाही कारण त्यातील बहुतेक नोटीशी अतिरिक्त माहिती मागण्यासाठी किंवा सबमिट करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी येते. अनेकदा करदात्याला रिफंड पाठवण्यापूर्वी तपासणीसाठी नोटीस पाठवली जाते. नोटीस येण्याचे सगळ्यात सामान्य कारण म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये त्रुटी किंवा तफावत आढळणे असते.
Property Documents: घर नवं असो किंवा जुने ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासल्याशिवाय डील करू नका! नाहीतर जाईल मालकी, तुमचे पैसे बुडतीलनोटीस आली? आता काय करायचं?
जर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस आली असेल तर आधी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करून घ्या. संपूर्ण नोटीस आधी तपासून घ्या. नोटीस येण्यामागचे कारण जाणून घ्या. नोटीस ही पुरवण्यात आलेल्या माहितीत आढळलेल्या तफावत किंवा त्रुटीसंबंधित असल्यास दिल्या गेलेल्या मुदतीमध्ये त्या सुधारण्यात याव्या किंवा योग्य माहिती विभागाला पुरवण्यात यावी. जुनी करथकबाकी वैध असल्यास ती दिलेल्या मुदतीच्या आत भरण्यात यावी अन्यथा दंड भरावा लागू शकतो. जर जुनी करथकबाकीची नोटीस वैध नसेल तर हरकत नोंदवण्यात यावी. नोटीस कोणत्या कलमाखाली आली आहे, ते तपासणे फार गरजेचे असते. कारण नोटिशीत वापरण्यात आलेले कलम उत्तर देण्याची प्रक्रिया ठरवतात.
