EPFO Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने नोकरी गमावल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर EPF खात्यातून शिल्लक विड्रॉल नियमांमध्ये बदल केला आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार आता नोकरी गमावल्यानंतर 12 महिन्यांनीच संपूर्ण रक्कम काढता येईल, तर याआधी 2 महिन्यांनंतर शिल्लक विड्रॉलची मुभा दिली गेली होती.

ईपीएफओने वरील दोन परिस्थितीत पीएफ खात्यातील शिल्लक काढण्यासाठी नवीन 12 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. म्हणजे नोकरी सोडली किंवा बेरोजगार झाल्याच्या 12 महिन्यांनीच पीएफ खात्यातील संपूर्ण शिल्लक काढण्याची परवानगी मिळेल.
ईपीएफओचा पीएफ विड्रॉलचा नियम बदलला
ईपीएफओच्या जुन्या नियमानुसार आणि 1952 योजनेनुसार पीएफ खातेदार नोकरी गमावल्यानंतर किंवा राजीनामा दिल्याच्या 2 महिन्यांच्या आत खात्यातील 100% शिल्लक विड्रॉ करू शकत होता. पण, आता ईपीएफ योजना 2026 मधून या नियमात लक्षणीय बदल केला गेला असून आता कर्मचारी नोकरी गमावल्यानंतर लगेचच पीएफ खात्यातील केवळ 75% रक्कम काढू शकतील, तर उर्वरित 25% रक्कम 12 महिन्यांनंतरच विड्रॉ करता येईल. ही 25% रक्कम ईपीएफओद्वारे फ्रीझ केली जाईल आणि उर्वरित रक्कम बेरोजगारीच्या सलग 12 महिन्यांनंतरच काढता येईल.
पीएफ विड्रॉलचे नवीन नियम काय
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा कायदा 2020 मधील तरतुदींनुसार पीएफ नियमांमध्ये व्यापक बदल केले गेले आहेत. आतापर्यंत बेरोजगार झाल्यानंतर 2 महिन्यांच्या आत PF खात्यातील संपूर्ण शिल्लक काढायची परवानगी होती, पण नवीन नियमांनुसार बेरोजगार झाल्यानंतर लगेचच 75% रक्कम काढता येईल, तर उर्वरित 25% रक्कम सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतरच काढता येईल. अशाप्रकारे, आता EPS मध्ये ठेव-संलग्न विम्याचाही समावेश केला गेला आहे.
पीएफच्या आंशिक योगदान नियमही बदलले
ईपीएफओने पीएफ अकाउंटमध्ये योगदान देण्यासंबंधीचे नियमबधी सुधारित केले आहेत. आता आंशिक पीएफ योगदान 15000 रुपयांच्या 12 टक्केपर्यंत मर्यादित केले असून कर्मचारी आणि नियोक्त्याला 15000च्या 12% योगदान देणे अनिवार्य असेल. यापेक्षा जास्त रकमेचे योगदान करायचे असेल तर, कर्मचाऱ्यांनी ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे VPF मध्ये योगदान करावे लागेल.
नोकरी करताना पीएफ विड्रॉलचे नियम काय?
याशिवाय ईपीएफओने नोकरीत असताना पीएफ विड्रॉलचे नियमही बदलले असून यानुसार आता पीएफ खात्यातून केवळ तीनच श्रेणींपुरती – जीवनावश्यक वस्तू, घर खरेदी किंवा विशेष प्रसंग – मर्यादा घातली गेली आहे. त्याचप्रमाणे, आता शिक्षणासाठी 10 वेळा, लग्न आणि घर बांधण्यासाठी पाच वेळा आणि विशेष प्रसंगांसाठी 2 वेळा पीएफ विड्रॉ केला जाऊ शकतो.

