Headlines

Nepal Floods Mumbai Doctor Milind Chitley led Hills and Trails Group Anagha Venkatram Annamdevara missing Daughter Tanvi gives Update; डॉ. मिलिंद चितळे यांच्या ग्रुपसोबत नेपाळला गेलेले आई-वडील बेपत्ता, लेकीला अश्रू अनावर, रडतच परीक्षा दिली


Mumbai Tourists Missing in Nepal : नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्या दाम्पत्याची कन्या तन्वी हिने इन्स्टा अकाऊण्टवरुन अपडेट्स दिले आहेत. आई-वडील सुखरुप असतील आणि नक्की सुरक्षित परत येतील, ही खात्री व्यक्त करतानाच तन्वीला अश्रू अनावर झाले.

Nepal Flood tanvimakesvideos Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अंधेरीतील डॉ. मिलिंद चितळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या हिल्स अँड ट्रेल्सच्या 60 पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. हा ग्रुप अचानक निर्माण झालेल्या नेपाळमधील पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या टीमतर्फे सांगण्यात आले आहे. या ग्रुपसोबत वेंकटराम अन्नमदेवरा आणि अनघा अन्नमदेवराही प्रवास करत होते. त्यांची कन्या आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तन्वी हिने tanvimakesvideos या इन्स्टा अकाऊण्टवरुन अपडेट्स दिले आहेत. आई-वडील सुखरुप असतील आणि नक्की सुरक्षित परत येतील, अशी खात्री व्यक्त करतानाच तन्वीला अश्रू अनावर झाले.

तन्वी काय म्हणाली?

“जे कोणी मला विचारत आहेत की मी कशी आहे, त्यांना सांगू इच्छिते, की माझी NEET PG ची परीक्षा होती.” त्यासाठीचा थंब प्रिंट दाखवत तन्वी म्हणाली, “तीन तासांच्या त्या परीक्षेतला मला वाटतं दीड तास तर मी फक्त रडतच होते. काही वेळा प्रश्न वाचणंही कठीण जात होतं, कारण डोळ्यांत अश्रू साठले होते. जेव्हा NEET PG ची स्क्रीन समोर असते, जिथे ते प्रश्न दिसतात… तिथे दोन फोटो असतात, त्यातला एक ॲडमिट कार्डवरचा फोटो असतो. तो फोटो माझ्या बाबांनी काढला होता. त्यामुळे NEET PG ची परीक्षा आणखीनच कठीण वाटली. आणि मला माहित होतं की, बाबांची इच्छा आहे की मी ही परीक्षा द्यावी.” असं तन्वी सांगते. नेपाळच्या महापुरात तिचे आई वडील बेपत्ता आहेत.

Maharashtra TimesNepal Floods : नेपाळ महापुरात भावंडांची ताटातूट, मुंबई एअरपोर्टवर पुन्हा भेटताच राखी बांधली, अश्रूंचा बांध फुटला, 83 भारतीय पर्यटक बेपत्ताच

तन्वीला अश्रू अनावर

“मला बाबांसाठी हे करायचं आहे. माझ्या आई-वडिलांसाठी हे करायचं आहे. मी तिथे बसले, ती परीक्षा पूर्ण दिली. आणि हो, मला वाटतं परीक्षेपेक्षाही कठीण गोष्ट म्हणजे… परीक्षेच्या आधी सकाळी, आई नेहमी ‘दही-साखर’ द्यायची, चमच्याने दही-साखर भरवायची. आणि बाबा मला ‘ऑल द बेस्ट, तन्वी’ म्हणायचे. पण या परीक्षेत तसं काहीच झालं नाही. त्यामुळे त्यांनी परत आलंच पाहिजे. त्यांना परत यावंच लागेल. ते परत न येण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी परत आलंच पाहिजे. कारण त्यांना… आईला मला पुन्हा दही-साखर भरवायची आहे. प्लीज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्लीज. बस…” असं म्हणत भावनावश तन्वीने व्हिडिओ थांबवला.

Maharashtra TimesAkansha Patel : जिजूला बर्थडे मेसेज, थँक्यूचा रिप्लाय आला, दहा मिनिटात महाप्रलय; आप्तांच्या ओढीने बहिणीला अन्न गोड लागेना, अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी दाम्पत्य बेपत्ता
वेंकटराम अन्नमदेवरा आणि अनघा अन्नमदेवरा यांचा शेवटचा संपर्क २६ ऑगस्ट, बुधवार रोजी सकाळी ८:२७ वाजता झाला होता. त्यांचे शेवटचे ज्ञात ठिकाण हे इमिग्रेशन सेंटर / फ्रेंडशिप ब्रिज होते. ते डॉ. मिलिंद चितळे यांच्या नेतृत्वाखाली हिल्स अँड ट्रेल्स / रिचा टूर्स सोबत गेले होते, अशी माहिती तन्वी अन्नमदेवरा हिने दिली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा