Digital Arrest Scam: एक फोन… आणि 90 लाख गायब! ‘डिजिटल अरेस्ट’च्या सापळ्यात अडकला निवृत्त व्यवस्थापक, काय घडलं? – nashik 60 yrs retired man loses rs 90 lakh after fraudsters keep him under digital arrest for 12 days
Digital Arrest Scam: एक फोन… आणि 90 लाख गायब! ‘डिजिटल अरेस्ट’च्या सापळ्यात अडकला निवृत्त व्यवस्थापक, काय घडलं? – nashik 60 yrs retired man loses rs 90 lakh after fraudsters keep him under digital arrest for 12 days
Digital Arrest Scam: नाशिकमध्ये एका ६० वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची तब्बल ८९ लाख ९९ हजार ७११ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : एका कॉलवर हुबेहूब मुंबई ‘एटीएस’चा पोलिस अधिकारी बनून बोलणारा … ‘तुमच्या नावाच्या बँक खात्यावरून ७ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाले आहे’, असा एकापाठोपाठ एक येणारा धक्कादायक फोन… आणि ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या बनावट पत्रांचा भडीमार करीत रचलेला डिजिटल अरेस्टचा सापळा! या थरारक आणि काल्पनिक जाळ्यात अडकून नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील एका ६० वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाने तब्बल ८९ लाख ९९ हजार ७११ रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली.
एका नामांकित खासगी कंपनीतील निवृत्त व्यवस्थापकाला अचानक एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘मी मुंबई पोलिसांतून बोलतोय, तुमच्या नावावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाला आहे’, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर लगेचच व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला. समोर दहशतवाद विरोधी पथकाचा (एटीएस) अधिकारी ‘रणबीर सिंग’ या नावाने बोलणारा व्यक्ती होता. त्याने तक्रारदाराच्या नावाने जम्मूतील एका बँकेत बनावट खाते असून, त्याद्वारे दहशतवाद्याने सात कोटींचे मनी लाँड्रिंग केल्याचा बनाव रचला. संशयितांनी तक्रारदाराला प्रचंड दहशतीखाली ठेवले.
Maharashtra FDA: एफडीएला पुन्हा चपराक, उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे, दोन प्रकरणांत नामुष्की‘ईडी’ आणि ‘रिझर्व्ह बँकेची’ बनावट पत्रे पाठवून अटकेची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर ‘आमची तुमच्या घरावर नजर आहे’ असे भासवणारा एक व्हिडीओ पाठवून त्यांना घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ केले. घाबरलेल्या निवृत्त व्यवस्थापकाने आपल्या आयुष्यभराची कमाई आणि शेअर बाजारात गुंतवलेली संपूर्ण रक्कम काढून घेतली.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाजसंशयितांनी त्यांना एका विशिष्ट बँक खात्यात रक्कम पाठवण्यास भाग पाडले. अटकेच्या भीतीपोटी तक्रारदाराने २५ ऑगस्ट रोजी तब्बल ८९ लाख ९९ हजार ७११ रुपये संशयितांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा