मुंबई: तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या भीषण पुरामुळं हाहाकार उडाला. या जलप्रलयात ९५ जणांचा मृत्यू झाला असून, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. या विनाशकारी पुरामुळे ५०० जण बेपत्ता झाले असून, यामध्ये किमान १०५ भारतीयांचा समावेश आहे. या महापुरात भारतीय कलाकारांनाही मोठा फटका बसला आहे. चित्रपट अभिनेते अंकुर रतनही या महापुरात अडकले असते, मात्र काही तासांपूर्वीच ते तिथन निघाल्यानं थोडक्यात बचानवले. तर दुसरीकडे प्रसिद्ध बंगाली अभिनेते खराज मुखर्जी आपल्या पत्नीसह नेपाळमधील दुर्गम भागात अडकल्याचंही म्हटलं जात आहे.
अंकुर रतन अवघ्या १२ तासांच्या फरकाने वाचले
कैलास मानसरोवर यात्रेवर गेलेले अभिनेते अंकुर रतनयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते, त्यांची पत्नी शिल्पा सूचक आणि चुलत बहीण सोनाली हे सर्वजण पूर येण्यापूर्वी अवघ्या १२ ते १६ तास आधी त्याच अपघातग्रस्त भागातून सुरक्षित बाहेर पडले होते. “आम्ही ज्या ठिकाणी फोटो काढत होतो, तिथं काही तासांतच महापुराने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. देवाची कृपा आणि आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सर्वजण वेळीच तिथून पुढं निघालो आणि सुरक्षित राहिलो,” अशी माहिती अंकुर यांनी दिली.
तर दुसरीकडं, ‘कहानी‘ आणि ‘स्पेशल २६’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलेले लोकप्रिय बंगाली अभिनेते खराज मुखर्जी आणि त्यांची पत्नी प्रतिभा मुखर्जी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी २० ऑगस्ट रोजी नेपाळला गेले होते. पुरामुळं रस्ते वाहून गेल्यानं आणि वाहतूक ठप्प झाल्यामुळं ते शूटिंग क्रू आणि अभिनेते रजतभ दत्ता यांच्यासोबत तिथंच अडकले आहेत.
खराज मुखर्जी यांच्या मुलानं (तमोघ्न) दिलेल्या माहितीनुसार, आईशी फोनवर संपर्क झाला होता, सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र, दरडी कोसळल्यामुळं टेलिफोन नेटवर्कही अनेक ठिकाणी बंद झालं असून आता संपर्क होणं कठीण झालं आहे. क्रू मेंबर्स रस्तेमार्गे गोरखपूर आणि तेथून विमानानं कोलकाता इथं परतण्याचा प्रयत्न करत आहेत.
भोटेकोशी आणि लेंडे खोला नद्यांना आलेल्या पुरामुळं रसुवा जिल्ह्यासह अनेक भागांत प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेक भारतीय पर्यटकही तिथं अडकल्याची माहिती समोर येत असून, भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासन मदत व बचाव कार्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा