Nepal Flood Tragedy: पुराचा प्रचंड लोंढा आल्यानंतर नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यातील एक पूल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला.

सगळ्यात आधी तिबेट भागात स्थानिक प्रमाण वेळेनुसार ८.३७ वाजता भूकंप झाला. यानंतर अवघ्या तीनच मिनिटांनी पूर आला. यावरून भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदीचे कडे कोसळल्याने हा जलप्रलय आला असावा, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी संसदेला सांगितले. तिबेटच्या दिशेने आलेल्या या पुरामुळे भोटे कोशी नदी दुथडी भरून वाहू लागली. तिबेटच्या सीमेला लागून असलेले रासुवा आणि धाडिंग जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला. त्यानंतर हा पूर धाडिंग, नुवाकोट आणि चितवन जिल्ह्यांपर्यंत पसरला, ज्यामुळे किमान चार पक्के पूल आणि काही तात्पुरत्या पुलांचे नुकसान झाले झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संपर्क साधून पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला; तसेच मदतीसाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही दिली.
Nepal Flood : नेपाळमध्ये महापूर! हजारहून अधिक लोक गेले वाहून, घर पत्त्यांसारखे कोसळलेनेपाळमध्ये बेपत्ता असलेले भारतीय कोणत्या राज्यातील आहेत, अशी विशिष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांना इतर वेळीही दिवसभरात संपर्क साधणे कठीण होते, आता नेपाळच्या तिमुरे गावापासून २० ते २२ किलोमीटवरील सेब्रुबेसी या गावापर्यंत हानी झाली आहे. तिथे संपर्काची साधने नाहीत.
महाराष्ट्रातील चार जण सुखरूप
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये सुमारे १३३ भारतीय आणि अन्य काही अनिवासी भारतीय अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याची धडपड सुरू झाली. महाराष्ट्रातील दोन मुंबईतील आणि दोन पुण्यातील पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही मुंबईकर पर्यटकांशी रात्री उशिराही संपर्क न झाल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
11 जलविद्युत केंद्रं, 40 रस्ते, 19 पूल, 10 पेक्षा अधिक बँका उद्ध्वस्त; पुरामुळे नेपाळवर संकटमोदी यांची मदतीची ग्वाही नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संपर्क साधूने झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला; तसेच भारत सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. ‘पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा केली. नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला,’ असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले.

