Headlines

Nepal flood China flags fresh glacial breach risk at Bhote Koshi as barrier lake may burst; फुटबॉलची 280 मैदानं बुडतील इतकं पाणी, नेपाळजवळ तलाव फुटण्याची भीती, चीनकडून इशारा, भारतीय सीमेपर्यंतच्या वस्त्यांनाही धोका


Bhote Koshi barrier lake : नेपाळ-तिबेट सीमेजवळील ‘छोछेन खोला’ आणि ‘पुरेपु त्सांगपो’ नद्यांच्या संगमाजवळ, नेपाळच्या बाजूला सुमारे २० लाख घनमीटर पाणी साठलेला नवीन तलाव गुरुवारीच ओसंडून वाहू लागला होता.

Nepal Flood Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीजिंग : हिमनदीशी संबंधित अडथळ्यामुळे निर्माण झालेला तलाव फुटण्याचा धोका असल्याचा इशारा चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने दिला आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर ‘छोछेन खोला’ आणि ‘पुरेपु त्सांगपो’ नद्यांच्या संगमाजवळ नेपाळच्या बाजूला हा नवीन तलाव तयार झाला आहे. त्यात सुमारे २० लाख घनमीटर पाणी साठलेले आहे. हा तलाव आधीच ओसंडून वाहत असताना पावसामुळे पुढील तीन दिवसांत ‘भोटे कोशी’ नदीच्या वरच्या प्रवाहातील भागात आणखी ३० लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता आहे.

नेपाळ-तिबेट सीमेजवळील ‘छोचेन खोला’ आणि ‘पुरेपु त्सांगपो’ नद्यांच्या संगमाजवळ, नेपाळच्या बाजूला सुमारे २० लाख घनमीटर पाणी साठलेला एक नवीन तलाव तयार झाला आहे. गुरुवारीच हा तलाव ओसंडून वाहू लागला होता.

तलाव फुटण्याचा इशारा

चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने पुढील तीन दिवसांत तलावात आणखी ३० लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता असल्याने, तलाव फुटण्याचा किंवा त्यातून पाणी ओसंडून वाहण्याचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी आलेल्या अचानक पुराच्या पाठोपाठ, २९ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे ‘भोटे कोशी’ नदीच्या प्रवाहातील पाणी पातळी पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

२८० फुटबॉल मैदाने बुडतील इतके पाणी

२० लाख घनमीटर पाणी म्हणजे १०५ मीटर बाय ६८ मीटर आकाराची आणि एक मीटर खोली असलेली सुमारे २८० फुटबॉल मैदाने पाण्याखाली जाण्याइतके पाणी. या सरोवराच्या दिशेने वाहून येण्याची शक्यता असलेले अतिरिक्त ३० लाख घनमीटर पाणी हे अशाच प्रकारच्या सुमारे ४२० फुटबॉल मैदानांइतक्या क्षेत्रावर पसरू शकेल इतके आहे.

Maharashtra TimesNagpur Crime : पतीचं निधन, पदरी दोन मुलं; लग्नाच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याच्या बॉडीगार्डवर गुन्हा

भारतीय सीमेपर्यंतच्या वस्त्यांना धोका

‘छोछेन खोला’ आणि ‘पुरेपु त्सांगपो’ या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो आणि नेपाळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या एकमेकींत विलीन होतात; या संयुक्त प्रवाहाची ओळख ‘भोटे कोशी’ नदी म्हणून आहे आणि पुढे ती ‘त्रिशूळ’ नदीला जाऊन मिळते. या अडथळ्यामुळे तयार झालेल्या सरोवरातील पाणी अचानक सोडले गेल्यास, बुधवारी आलेल्या पुराचा फटका बसलेल्या मार्गावरुनच ते पाणी खालील दिशेने वाहू शकते. त्यामुळे दक्षिणेकडील भारतीय सीमेपर्यंतच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

परराष्ट्र मंत्रालयामार्फत चीनकडून या अडथळ्याबाबत माहिती मिळाल्यानंतर नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एनडीआरआरएमए) इशारा जारी केला आहे. “सरोवराचा आकार वाढतच चालला आहे आणि ते फुटण्याचा धोका आहे,” असे एनडीआरआरएमएने म्हटले आहे. पूर-पूर्वसूचना विभागाने भोटे कोशी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने खालील भागात राहणारे नागरिक, तसेच प्रवासी आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

चीनकडून पूर्वसूचना

चीनच्या जलसंपदा मंत्रालयाने सांगितले की, ते तलावावर लक्ष ठेवून आहेत. संभाव्य गळतीच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी पूर्वतयारी करत आहेत. चिनी अभियांत्रिकी पथकांनी अडथळ्याचा नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन, पोर्टेबल सॅटेलाइट उपकरणे आणि ३डी लेझर स्कॅनरचा वापर केला. एका खोऱ्यात मोठ्या प्रमाणात तपकिरी पाणी साचले होते आणि त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. हवामानाच्या अंदाजामुळे चिंतेत भर पडली आहे.

Maharashtra TimesMPSC Paper Leak : संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डीलचीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने २९ ऑगस्टपर्यंत ग्यिरोंग काउंटीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही कालावधीत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येतील. शिन्हुआने मुख्य हवामान तज्ज्ञ मा शुएकुआन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दुपारच्या परिस्थितीत मेघगर्जनेसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाच्या काही सरी येऊ शकतात.