Headlines

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 10 टक्के पाणीकपात; 25 मेपासून दोन दिवस संध्याकाळचा पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका? – 10 percent water cut in navi mumbai evening supply to be cut for two days from 25 may 2026


Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत ही कपात सुरू राहणार आहे.

navi mumbai water cut
नवी मुंबई पाणीकपात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे नवी मुंबई महापालिकेने शहरात पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २५ मेपासून संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे. पाणीबचतीचे नियोजन म्हणून शहरातील वेगवेगळ्या विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून, सध्या प्रत्यक्षात ३६.४७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १९.११ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील वर्षाच्या नियोजनासाठी जपून वापरणे आवश्यक असल्याने ही कपात लागू करण्यात आली आहे.

Maharashtra Timesराज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
महापालिकेच्या या निर्णयाचा फटका केवळ महापालिका क्षेत्रालाच नाही, तर मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या सिडको नोडमधील खारघर आणि कामोठे या भागांनाही बसणार असून या दोन्ही सिडको क्षेत्रांमध्ये दर शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो आणि ‘आयओडी’ परिस्थितीबाबत व्यक्त केलेला अंदाज या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात येत आहे.

Maharashtra TimesMount Everest Tragedy: शिखर तर गाठलं, पण परतीच्या वाटेवर अनर्थ; दोन भारतीय गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर सोडला जीव
पाणी बंदचे वेळापत्रक
बेलापूर —-सोमवार व गुरुवार
नेरूळ —-मंगळवार व शनिवार
तुर्भे —-बुधवार व रविवार
वाशी —-गुरुवार व सोमवार
कोपरखैरणे —-मंगळवार व शनिवार
घणसोली —-बुधवार व रविवार
ऐरोली —-शुक्रवार दिघा म.औ.वि.मं. च्या शटडाऊन संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे

ठाण्यातही कपात

ठाणे : मुंबई महापालिकेने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागांतील पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी; लोकमान्य-सावरकर नगर समितीमधील साईनाथ नगर, शिवाजीनगर, अंबिका नगर; माजीवाडा-मानपाडामधील बाळकुम पाडा, आंबेडकर नगर, गांधीनगर या परिसरात १० टक्केकपात लागू राहणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा