Headlines

Navi Mumbai Politics: आमदार निधीवरुन वादंग! नवी मुंबईतील विकासकामांच्या उद्घाटनावरुन सत्ताधाऱ्यांतच श्रेयवाद


Navi Mumbai Politics: उद्घाटनाच्या श्रेयवादावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, या अन्यायाविरोधात आता शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

eknath shinde ganesh naik
नवी मुंबई राजकारण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनावरून सत्ताधाऱ्यांमध्येच राजकीय वाद पेटला आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला असतानाच भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री गणेश नाईक यांनी घुसखोरी केल्याचा आरोप केला.

आमदार म्हात्रे यांच्या मते, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार निधीचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळणे राजशिष्टाचाराला धरून नाही, असे त्या म्हणाल्या. या मुद्द्यावरून त्यांनी महापालिका प्रशासनासह, सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि मंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य केले. वाशी येथील महापालिका रुग्णालयात उभारण्यात आलेल्या रुग्णसुविधांचे लोकार्पण करण्यासाठी आलेले वनमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्यासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच, भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : ‘तू घेतलेली मुलाखत मला कायम लक्षात राहील’, चिमुकल्या मुलीच्या इंटरव्ह्यूने मुख्यमंत्री भारावले
‘हा महापौरांचा अधिकार’
‘महापालिका ही लोकशाहीत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा कोणाला खूश करण्यासाठी नियमांना बगल दिली जाऊ शकत नाही’, असे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून विरोधकांनी केलेले सर्व आरोप पुराव्यांसह फेटाळून लावले. यासोबतच, विरोधकांचे आंदोलन हे केवळ राजकीय अज्ञानातून सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेला डावलले जात असल्याचा आरोप खोडून काढताना महापौरांनी थेट शासन निर्णयाची प्रतच प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार, महापालिका क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये स्थानिक सन्माननीय विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांना आमंत्रित करणे बंधनकारक असते. याच नियमाचा आदर ठेवून निमंत्रण पत्रिकेत खासदार आणि स्थानिक आमदार यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची नावे सन्मानाने छापण्यात आली आहेत’, असे त्या म्हणाल्या.
Maharashtra TimesJayant Patil: राज्यातील स्मार्ट मीटर योजनेला स्थगिती द्या! जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सरनाईक यांची संतप्त प्रतिक्रिया
नवी मुंबई महापालिकेच्या विकास कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रणापासूनदेखील शिंदे यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते. त्या आदेशाला ७२ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा एकदा पालकमंत्री शिंदे यांचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा