Navi Mumbai Panvel Gadeshwar Dam One Youth Dies While Swimming One Missing; पोहण्याचा मोह अंगलट, अंदाज न आल्यानं दोघं बुडाले, बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू; एकजण बेपत्ता
Navi Mumbai Panvel Gadeshwar Dam One Youth Dies While Swimming One Missing; पोहण्याचा मोह अंगलट, अंदाज न आल्यानं दोघं बुडाले, बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू; एकजण बेपत्ता
Panvel Gadeshwar Dam News : पनवेलमधील प्रसिद्ध गाडेश्वर धरण परिसरात काल रविवारी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकाचा अद्याप शोध सुरु आहे.
पनवेल गाडेश्वर धरण तरुणाचा बुडून मृत्यू एकजण बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पनवेल : नवी मुंबई जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील धोधाणी परिसरात काल रविवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाघाची वाडी येथील गाडेश्वर धरणातीस नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेलं. या दुर्घटनेत विचुंबे येथील सुमित यशवंत पवार याचा मृत्यू झाला असून नयन म्हात्रे हा तरुण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 10 मित्रांचा एक ग्रुप काल रविवारी धोधाणी येथील वाघाची वाडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. अशा परिस्थितीत गाडेश्वर धरणातील नदीत पोहत असताना सुमित पवार आणि नयन म्हात्रे यांना पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते दोघेही वाहून गेले. दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला. ग्रुपमधील काही मित्र त्यांना लाकडी बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र, त्या दौघांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. Mumbai Rain: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; लोकल वाहतूक विस्कळीत, दुपारनंतर आणखी गंभीर स्थिती, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचं आवाहन
एकाचा मृत्यू तर एक बेपत्ता
घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केलं. अथक प्रयत्नांनंतर सुमित पवार याला पाण्याबाहेर काढण्यात यश आलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. दुसरीकडे नयन म्हात्रे याचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. धोधाणीचे पोलीस पाटील यांनी सांगितले की, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून शोधमोहीम सुरूच आहे. Satara Koyna Dam : साताऱ्यात पावसाचं थैमान; कोयना धरणाची पाण्याची आवक झपाट्याने वाढली, अतिवृष्टीचा इशारा, लिंगमळा धबधबा मार्ग बंद
संपूर्ण परिसरात शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे विचुंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्यात नद्या, ओढे आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह क्षणार्धात वाढू शकतो. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा करण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही अशा घटनांमध्ये तरुणांचे जीव जात असल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा