Headlines

Nashik Vilholi Youth First Killed then Pushed off Terrace in Anger Over Video; नाशिकमध्ये शूटिंगच्या वादातून तरुणाला संपवलं, मारहाणीच्या भीतीने गच्चीवर धाव; तिथेच नको ते घडलं


Nashik Crime News : नाशिकमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना घडली आहे. मित्राला मारायला आलेल्या आरोपींना अडवण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे आरोपींनी तिसऱ्याच व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime News
नाशिक विल्होळी तरुणाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मोबाइल फोनमध्ये चित्रीकरण केल्याच्या जुन्या वादातून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून आणि इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना विल्होळी येथील संघर्षनगर परिसरात घडली.

संभाषणाचे मोबाइलवर चित्रीकरण

राहुल संजय सरकटे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, दोघे फरार आहेत. रविवारी (दि. १६) शांताराम गाडेकर यांनी दीपक पारधी व ज्योती बोंबले यांच्यातील संभाषणाचे मोबाइलवर चित्रीकरण केले होते. याच कारणावरून दीपक पारधी याचा गाडेकर यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर गाडेकर यांना मारहाण करण्यासाठी दीपकने अजय रामदास गांगुर्डे (रा. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) आणि वैभव गोविंद मेंगाळ (दत्तनगर, अंबड) यांना विल्होळी येथे बोलावल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास शांताराम गाडेकर, रमेश खरे आणि राहुल सरकटे हे पिकअप वाहनातून जात असताना संशयितांनी मच्छी मार्केटजवळ त्यांची गाडी अडवली.

Maharashtra TimesNashik Crime : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळा

मारहाणीच्या भीतीने गच्चीवर धाव

संशयितांनी गाडी अडवल्यावर मारहाणीच्या भीतीने तिघेही गाडेकर यांच्या दुमजली घराच्या गच्चीवर पळाले. त्यानंतर संशयित अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांनी शिवीगाळ करीत त्यांचा पाठलाग केला. इमारतीच्या गच्चीवर पोहोचल्यानंतर संशयित अजय गांगुर्डे याने ‘तू मध्ये आला, आधी तुलाच मारतो’, असे म्हणत राहुल सरकटे यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर जखमी अवस्थेतील राहुलला संशयित वैभव मेंगाळ याने दुमजली गच्चीवररुन खाली सिमेंटच्या रस्त्यावर ढकलून दिल्याचाही आरोपी आहे. त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राहुलचा मृत्यू झाला. घटनेनंतर गांगुर्डे, मेंगाळ हे पिकअप गाडी घेऊन घटनास्थळावरुन पसार झाले.

Maharashtra TimesST Bus : एसटी महामंडळाचा वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल, भाडेवाढीनंतरही उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, आता प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन

..या संशयितांविरोधात गुन्हा

जखमी राहुलला नातेवाइकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत राहुलचा मोठा भाऊ अनिल संजय सरकटे (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील रोहकले आणि नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या निरीक्षक मृदुला नाईक यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी संशयित दीपक पारधी याला ताब्यात घेतले असून, फरारी संशयित अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा