Headlines

Nashik Sinnar Two Roads Proposal 300 Crores Submitted for four Laning; सिन्नरच्या विकासाला वेग, तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर, दोन प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव; कसा अन् किती फायदा होणार?


Sinnar Four Way Construction Road : सिन्नरच्या विकासाला आता वेग आला आहे. सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहरातील १३ किमी मार्गांचे चौपदरीकरण करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Sinnar Four Way Construction Road
सिन्नर दोन मार्गांचं चौपदरीकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक (सिन्नर) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील दोन प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेवरून सिन्नर बाह्यवळण ते गुरेवाडी फाटा तसेच संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी या मार्गांच्या काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला.

दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांचाही समावेश

सिन्नर आणि मुसळगाव एमआयडीसीतील विस्तारामुळे या मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. पुणे, नाशिक आणि शिर्डीकडून होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक, वाढती वाहनसंख्या आणि अपुरे रस्ते यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या मार्गांच्या चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० आणि १६० मधील १३.८० किलोमीटरचा भाग राज्यमार्ग २७ (अ) आणि २७ (ब) म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार सिन्नर बाह्यवळण ते गुरेवाडी फाटा या ८.५ किलोमीटर आणि संगमनेर नाका ते मुसळगाव एमआयडीसी या ५.३ किलोमीटर मार्गांचे काँक्रिटीकरणासह चौपदरीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंना पादचारी मार्गांचाही समावेश करण्यात आला आहे.
Maharashtra TimesSiya Chetan Love Story : काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं
सध्या या मार्गांपैकी सुमारे ५.१० किलोमीटर भागाचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी उर्वरित ८.७० किलोमीटर रस्ता दोन पदरी असल्याने वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कुंभमेळ्याच्या काळात वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. या प्रकल्पासाठी रस्त्यांच्या कामांवर २४० कोटी रुपये, पूल व इतर संरचनांवर २० कोटी रुपये तसेच इतर पूरक कामांसाठी ४० कोटी रुपये असा एकूण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आमदार तथा माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अविनाश देवरे यांनी तो कुंभमेळा आयुक्तांकडे सादर केला आहे.

भाविकांचा ओघ अपेक्षित

ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर, कमलेश्वर बारव, श्रीराम मंदिर, चौदा चौक वाडा आणि अन्य धार्मिक स्थळांमुळे सिन्नरला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने कमलेश्वर बारव येथे अमृतस्नानासाठी तसेच गोंदेश्वर मंदिर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने या मार्गांच्या उन्नतीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मोठा फायदा होणार आहे.
Maharashtra TimesNashik News : ‘काय व्हिडिओ काढताय, माझं सोन्यासारखं लेकरु गेलंय’; नाशकात 16 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर अंत, आईचा आक्रोश, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा

एकूण प्रकल्प खर्च

३०० कोटी रुपये
रस्त्याची एकूण लांबी
१३.८० किलोमीटर

कुंभमेळा आणि औद्योगिक वाहतूक लक्षात घेऊन नियोजन

वाहतूक कोंडी व अपघात कमी होण्याची क्षमता

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा