Headlines

Nashik Saint Nivruti Maharaj Palkhi Departs from Trimbakeshwar Towards Pandharpur Attended by Thousands Warkaris; वारी चुकायाची नाही! निवृत्तिराया निघाले पांडुरंगा भेटी; कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान


Nashik Saint Nivruti Maharaj Palkhi : त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ विकासकामांच्या अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीचा पारंपरिक मार्ग बदलण्यात आला. याची माहिती नसल्याने मंदिराकडे जाताना आणि परत येताना भाविक खोदलेल्या रस्त्याने कसरत करत मार्ग काढताना दिसत होते. नव्याने बदललेल्या मार्गावर नगर परिषद प्रशासनाने खोदकाम बुजवले, मात्र सकाळी आलेल्या पावसाच्या सरींनी सर्वत्र चिखल झाला होता.

Nashik Saint Nivruti Maharaj Palkhi
संत निवृत्ती महाराज पालखी पंढपूरकडे प्रस्थान(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, मृदंग आणि मुखी निवृत्तिरायासह पांडुरंगाच्या नावाचा अखंड जप, अशा भक्तिपूर्ण वातावरणात संत निवृत्तिरायांनी पाडुरंगाच्या भेटीसाठी सोमवारी (दि. २९) त्र्यंबकनगरीहून प्रस्थान ठेवले.

नारळ प्रसादाचा कार्यकम

सोमवारी सकाळपासून संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी तयारी सुरू झाली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नारळ प्रसादाचा कार्यकम झाला. पालखीसाठी आलेले मानकरी ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर यांसह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते या स्थानिक नेत्यांसह मुंबईहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनीही पालखी प्रस्थानासाठी हजेरी लावली. संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माधवदास राठी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त, पुजारी ह. भ. प. जयंत महाराज गोसावी आदींची उपस्थिती होती.
Maharashtra TimesMSRTC Bus : दुर्गम गावांना ‘लालपरी’चाच आधार, सामान्यांना एसटीचा सुरक्षित आसरा; दररोज सव्वादोन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न

नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला

दुपारी अडीचच्या सुमारास पालखी नाथांच्या संजीवन समाधी मंदिरापासून पुढे निघाली. भगव्या पताका, सजवलेले अश्व, नगाऱ्याचा रथ असा डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला. यावेळी पालखी प्रस्थान मार्ग बदलण्यात आला होता. चौकीमाथा तसेच तेलीगल्ली या परिसरातील ग्रामस्थांनी प्रथमच या मार्गे पालखी प्रस्थान होत असल्याने आनंद व्यक्त केला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जागोजागी घराच्या सज्जातून नागरिक पुष्पवृष्टी करत होते.

वारकरी भक्तांनी अभंगसेवा सादर केली

कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांची महापूजा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे व त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. येथे आरती होऊन नाथांची पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आली. येथे त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्तांनी स्वागत केले. संत निवृत्तिनाथ महाराज आणि भगवान त्र्यंबकराज यांची भेट झाली. वारकरी भक्तांनी अभंगसेवा सादर केली. येथे भक्तांनी फुगड्या घातल्या. पहिला मुक्काम प्रस्थानापासून २ किमी अंतरावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यातील गहिनीनाथ महाराज समाधीस्थळावर होता.
Maharashtra TimesVijaymala Pawar : आईच्या मनाला मोठी वेदना, भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य; नसरापूर केसमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भावूक प्रतिक्रिया

व्हीआयपींच्या वाहनांमुळे नियोजन कोलमडले

संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर परिसरात कोंडी होऊ नये, म्हणून खबरदारी घेत मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. तथापि, पालखी प्रस्थानाच्या वेळेत येथील आखाड्यांच्या साधूंच्या वाहनांचा ताफा, मंत्री महाजन यांच्या वाहनांचा ताफा आणि त्याच सोबत राजकीय पक्षांचे पुढारी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक नेते मंडळी यांच्या वाहनांनी एकच गर्दी केल्याने सर्व नियोजन कोलमडले. वाहनांच्या गर्दीतून पायी चालणाऱ्या भक्तांना वाट काढणे अडचणीचे ठरले होते.
Maharashtra TimesNashik News : मटणानंतर दही खाललं, नाशकात शेतकरी दाम्पत्याला विषबाधा, महिलेचा करुण अंत, वृद्धाची मृत्यूशी झुंज

प्रशासनाचे वरातीमागून घोडे

२९ आणि ३० जून रोजी नागरिकांनी खासगी वाहनाने येणे पूर्णपणे टाळावे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, बांधकाम विभागाचे उप अभियंता विजय बाविस्कर यांनी केले आहे. खरेतर प्रशासनाकडून हे आवाहन पालखी प्रस्थानापूर्वी किमान दोन दिवस आधी व्हायला हवे होते. परंतु, ऐनवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे प्रशासनाच्या वरातीमागून घोड्याचा प्रत्यय आला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा